Fri. Nov 7th, 2025

दिस जातील दिस येतील

Spread the love

*हेही दिवस जातील* *मित्रा …!*
✍️ २७२४

🩷🩷🩷🩷💎

ज्याला आपण आपला मानला, ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून,आपला जीव प्रसंगी धोक्यात घालून,मोठमोठ्या संकटातून त्याला सोडवलं,त्यांनंच जर आपल्याला संपवण्यासाठी, आपलं नरड धरलं तर,दोष कुणाचा ?
आपल्या कर्मगतीचा ?
की काळाचा ?
आणि याला उत्तर काय आहे ?

जवळ जवळ प्रत्येकाच्या च जीवनात असे महाभयंकर प्रसंग येत असतात काय ?

अशावेळी तमाशा बघणारेही खूश असतात.आणी त्यांना मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत असतात.

त्यांच्याकडे कदाचित हास्याचे फवारे ही असू शकतात.

पण ते हे विसरतात की , एक दिवस आपल्यावरही अशीच वेळ येणार आहे.

म्हणून संकटात एखाद्याला आधार देता येत नसेल तरी चालेल पण त्याच्या डोळ्यात अश्रू येतील असे तरी वागू नये.

अशावेळी मन स्थिर ठेवून, सद्गुरु वचनावर व ईश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले तर, पुढील जीवन उत्कर्षदायी होते.

प्रसंगावधान व धैर्य अशा प्रसंगी खूप महत्वपूर्ण ठरते.

कदाचित आपल्याला भयंकर मोठ्या संकटातून सोडवून यशाकडे नेण्यासाठी ही ईश्वराची अदृश्य योजनाही असू शकते.

म्हणूनच अशा भयंकर प्रसंगात, भांबावून अथवा गांगारून न जाता,हार न मानता , खंबीरपणे मार्गक्रमण करणे व संयमी राहणे खूपच महत्वाचे असते.

बरेच जण अशा भयावह प्रसंगात कोलमडून पडतात .एकाकी पडतात.कुणाला हार्ट एटैक येतो.त्यातच त्याचा दुर्देवी अंत होतो.कोणी असह्य दुःख अतिरेकाने, वेडा होऊन रस्त्याने फिरतो.तर कोणी आत्महत्या करतो.तर कोणी व्यसनाधीन बनून आपले उभे आयुष्यच बरबाद करतो.

कदाचित ही प्रत्येकाची कठोर सत्वपरीक्षा व अग्नी परीक्षाच असावी.

यातून ताऊन सुलाखून जो बाहेर पडतो व ईश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून खंबीरपणे मार्गक्रमण करतो तो नक्कीच यशोशिखरावर पोचतोच पोचतो.

म्हणून बंधूंनों संकटात हार मानू नका, खचून जाऊ नका.

हेही दिवस जातील.
चांगले दिवस येतील,
यावर दृढ व खंबीर विश्वास ठेवा.

प्रत्येकाच्या जीवनात उलथापालथ व अनेक स्थित्यंतरे होतच असतात.

खंबीर व्हा.
यशस्वी व्हा.

शत्रू शरण येऊन दारात आला तर त्याच्यावरही उपकार करा.
हाच ईश्वरी सिध्दांत आहे.

*राम कृष्ण हरी*

🙏🕉️🚩🚩🚩

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!