
*दुस-याचे दुःख ?*
✍️ २७४६
दुस-याचे दुःख बघून तुमच्या डोळ्यात जर अश्रुधारा येत असतील तर तुम्ही नक्कीच देवपदाला पोचलेला आहात.अथवा देवदूत तरी आहात , असे समजावे.
पण जर दुस-याचे दुःख बघून तुम्ही खदखदा हसत असाल तर तुम्ही नक्कीच जीतेजागते हैवान , राक्षस , असुर आहात हे नक्की.
प्रत्यक्ष कांही पिशाचेही दयाळू व परोपकारी असतात , हे मी स्वतः अनुभवलेलं आहे.
तर अनेक दुष्ट माणसे ही भयंकर विषारी सापापेक्षाही जालिम विषारी व घातक असतात , हेही मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघीतलेलं आहे.
तुम्ही कोण आहात हे तुम्हीच ठरवा.
देवदूत की दुष्टात्मा ?
*जय श्रीकृष्ण*
*विनोदकुमार महाजन*
