Tue. Dec 30th, 2025

घरातील भांडण

Spread the love

*तुमच्या घरात सतत* *अशांती आहे का ?*
✍️ २७४५

*विनोदकुमार महाजन*

😳😳😳😫😫

ज्या घरामध्ये सतत सुख , शांती, समाधान , आनंद, संपत्ती, ऐश्वर्य , प्रेम , एकमेकांवरील अतुट विश्वास नांदत असतो त्या घरावर अज्ञात दैवी शक्तिचे वास्तव्य , वरदान व संरक्षक कवच असते.

कठोर तपश्चर्या करूनही असे आनंदी , स्वर्गतूल्य घर बनवता येते .

मी माझे घर असेच स्वर्गतूल्य बनवले आहे ,
ही माझ्यावर माझ्या सद्गरू आण्णांची परम कृपा होय .

पण आजच्या भयावह कलीयुगामधून अनेक घराची शांती जवळजवळ संपलेली आहे.भंग पावलेली आहे , असे दिसते आहे.

अनेक घरांमध्ये आज टोकाचा संघर्ष , जीवघेणी भांडणे , कटकटी, बेचैनी , अस्वस्थता आहे.

नातीच नात्याची वैरी होत आहेत.एकमेकांच्या जीवावर उठत आहेत.

आज सगळीकडेच असं भयावह का घडते आहे ?

कारणे अनेक आहेत.
( १ ) एक तर कलियुगाचा भयंकर विपरीत प्रभाव.
कितीही चांगुलपणा दाखवला तरी अंगलट येणे व त्यामुळे त्यातून असह्य त्रास , मनस्ताप सहन करावा लागणे.कितीही उच्च कोटीचे प्रेम करूनही त्याची किंमत शून्य ठरणे.

आणि शेवटी जीवनच नकोसे वाटणे.

( २ ) दूसरे म्हणजे आपापले कर्म , संचित , प्रारब्ध भोग हेही महत्त्वाचे कारण आहे .

( ३ ) आपल्या घरावर पितरांचा दोष , पुर्वजांचा शाप असणे .
घरातील एखाद्या व्यक्तिचा अपघाताने , आत्महत्येने मृत्यू झाला असेल व त्या आत्म्याला गती नसेल , त्याला मोक्ष मिळाला नसेल तरीही अशा घरात नेहमी अशांती , बैचैनी , भांडणे कटकटी होत राहतात .

( ४ ) घरामध्ये पैशावरूनही नेहमी भांडणे होत राहतात, अथवा मानसिक विकृती मधूनही भांडणे कटकटी होत राहतात .

( ५ ) सततचे आजारपण , आर्थिक समस्या यामुळे ही ब-याच वेळा घरात चिडचिड , भांडणे कटकटी होत राहतात .

( ६ ) सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे , घरात दुष्ट शक्तिद्वारे , काळी विद्या , ब्लैक मैजीक , अघोरी शक्तीने घरात सतत भांडणे कटकटी लावली जातात.
त्या घरादाराचे संपूर्ण वाटोळे करणे , मानसात माणूस न ठेवणे , घरातील माणसे वेडी , पागल करणे , असे भयंकर प्रकार केले जातात .

हे खरं आहे का ?
होय हे सगळं खरं आहे.
मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे.

अती भयावह आयुष्य असतं हे. यातून सगळं घरदार पार उध्वस्त होतं.

हसती खेळती कुटुंब ही बरबाद होतात.

कांहीं दैवी कृपा असेल , सद्गुरू कृपा असेल , ईश्वरी कृपा असेल तरच आणि तरच आपण यातून बाहेर पडून एक सुखी , आनंदी जीवन जगू शकतो.

अन्यथा सारे जीवनच सैरभैर , विस्कळीत होऊन जाते.

अघोरी ब-याच वेळा देवता बंधन , लक्ष्मी बंधन , कुलदेवता बंधनही करतात.त्यामुळे आपण कितीही देवधर्म केला , जपजाप्य केला तरी त्याचा कांहीही.उपयोग होत नाही.व त्यामुळे घरातील भांडणे कटकटी कधीच थांबत नाही व त्या घरात नेहमीच बैचैनी , अशांती कायम राहते .

ब-याच वेळा अघोरी तांत्रिक ब्लैक मैजीक करून , एखाद्याला समाजातून , माणसातून , आयुष्यातून उठवण्यासाठी त्याला वेडा , पागल बनवतात.

लोकं चर्चा करतात ,
माणूस तर चांगला आहे पण असा विचित्र , विक्षिप्त , वेड्यासारखा का वागतो आहे ?

असे अनेक प्रकार समाजात सापडतात.

स्वप्नात भूतंखेतं येणं , साप येणं , स्वप्नात एखादा मोठ्याने ओरडणं , भांडणे , शिविगाळ करणं , आजारपण , शत्रूपिडा , आर्थिक कोंडी असे अनेक भयावह प्रकार तांत्रिक क्रियेद्वारे केले जातात.

जारण , मारण , उच्चाटन सारखे भयावह अघोरी प्रकार केले जातात.

भूत , पिशाच , हडळ , रानगा , जींद , मूंजा , झोटिंग , ब्रम्ह पिशाच , कर्ण पिशाच असे अनेक भूतांचे प्रकार असतात.
अघोरी स्मशान साधनेमध्ये अशा अतृप्त आत्म्यांना मंत्र शक्तिने वश करून , अघोरी कृत्य करवून घेतात.

आणि अघोरी शक्ती कलियुगात एवढी सामर्थ्यशाली असते की अनेक वेळा आपल्या ब-याच खडतर सात्विक साधनाही फेल होतात.

तांत्रिक क्रियेला करणी , भानामती , चेडा , चेटूक म्हणूनही संबोधले जाते.

यातून सुटकारा पाहीजे असल्यास नाथ सांप्रदायातील पोचलेला साधूच असल्या भयंकर, विनाशकारी काळ्या विद्येवर मात करू शकतो व नवजीवन देऊ शकतो.

पण असे खरे साधू सापडणंही दुरापास्त झालंय.
जागोजागी पैशाचा बाजार अन् भोंदूगिरी व बुवाबाजीचं भयंकर पीक आज देशात आलं आहे.

आणि अधर्मी व विधर्मी याचा आज अचूक गैरफायदा घेऊन समाज नागवत व नासवत आहेत.

अशावेळी ज्यांच्यावर विशेष दैवी कृपा आहे , विशेष सद्गुरू कृपा आहे , अशा व्यक्तिंच्या संगतीत , सानिध्यात मात्र आपले मन शांत व प्रसन्न , स्थिर राहते.
सुखी आयुष्य सुरु होऊ शकते. तसे मार्ग सापडत राहतात.

पण कलियुगात अशी उच्च कोटीची माणसें भेटनेही दुरापास्त झाले आहे.

आपल्या पुर्व पुण्याईने अशी माणसें आपणास भेटतातही पण त्यांची कींमत ही आपणास कर्म गती मुळे कळत नाही.

आज सगळीकडेच स्वार्थाचा , मोह मायेचा बाजारच एवढा भयावह आहे की खरी , निखळ प्रेम करणारी , निर्भेळ प्रेम करणारी माणसंही दुरापास्त होत चालली आहेत.

जिकडे तिकडे पैशाचा बाजार , मोहमायेचा बाजार , ढोंगबाजी , भोंदूगिरी , नकली बुवाबाजी , दिखाऊपणा ,
वरपांगी प्रेम , पैशासाठी प्रेमाचे नाटक , अंधश्रद्धा , चाटुकारीता येवढी भयंकर विकोपाला गेली आहे की , खरं काय आणि खोटं काय हेच समजेनासं झालं आहे.

त्यामुळे समाजात जिकडे तिकडे बजबजपुरी , अशांती , बेचैनी वाढलेली दिसते .

नशाबाजी भयंकर प्रमाणात वाढते आहे .

एकमेकांवरील प्रेम विश्वास , संपत चालला आहे .
पैसा हाच देव बनत चालला आहे.

देव व अध्यात्माचा ही बाजार मांडला जातो आहे.
भुलभुलैय्या वाढतो आहे.
त्यातून अनेक जणांची भयंकर फसगतही होते आहे.

जागोजागी ढोंगी अघोरी , बुवाबाजीचे पेव फुटले आहे . त्यामुळे समाज व समाज मनही सैरभैर , त्रस्त , अशांत आहे.
घराघरांतून अशांती आहे.

नातीच नकोसी होत चालली आहेत.

परिस्थिती भयावह आहे.
धर्म संकट मोठे आहे.
संस्कृती , सभ्यता , शालीनता , मनाचे मोठेपण नामशेष होत चालले आहे.

आयुष्य भरासाठी एकमेकांचा एकमेकांवरील विश्वास संपत चालला आहे.

माणसं माणसापासून दूरावत आहेत.
नाईलाजाने एकटे पणाने जगण्याची वृत्ती वाढते आहे.

हे सगळं कशाचं प्रतिक आहे ?
सामाजिक अंध:पतनाचं ?
की सामाजिक विकृतीचं ?

की सामाजिक प्रगतीचं ?

आपलं कल्याण करणारी , अखंड कल्याण चिंतणारी , खरं , निर्व्याज्य प्रेम करणारी माणसं दुर्मीळ होत चालली आहेत.

” तो पागल आहे रे , त्याच्या नादी लागू नको ”
असंच जवळजवळ प्रत्येक ठिकाणी ख-या व चांगल्या माणसांबद्दल बोलंलं जातंय ?
हे कशाचे द्योतक आहे ?

मुळापर्यंत जाऊन कोणी विचार करायलाच तयार नाही ?

जी खरी माणसं आहेत त्यांची कींमत शून्य होत चालली आहे.

खरंच ही संस्कृती आहे की विकृती आहे ?
वरचेवर माणूस सुसंस्कृत होतो आहे की असंस्कृत ?

कुठं चुकतंय , कुणाचं चुकतंय , कुठे माणूस हरवत चाललाय , कुठे भरकटला जातोय ?
कांहीच कळेनासे झाले आहे.

पैसा हातात आला पण माणसंच माणसापासून दूरावत चालली आहेत , हेच समाजाचं आजचं विदारक , भयानक चित्र आहे.

ख-या माणसांना , ख-या प्रेमालाही केराची टोपली दाखवली जाते आहे.

खरंच कुठं चाललाय माणूस ?
कुठं चाललाय समाज ?

विनाशाकडे ?

आणि याला कांहीं इलाज , अंतिम उत्तर , उतारा आहे की नाही ?

आज नाही उद्या चांगले दिवस येतील , माणसं बदलतील , या वेड्या आशेवर किती दिवस जगायचे ?

सामाजिक , कौटुंबिक विदारक चित्र मांडण्याचा मी बापडा प्रयत्न केला आहे.
किती जणांना कळेल , समजेल हाही प्रश्न आहेच.

ज्याला कळेल तो सुटेल.

अन्यथा ?
जन्मोजन्मीचं हे प्रारब्ध चक्र असंच चालत राहणार का ?

बघा , योग्य वाटलं तर कांहीं विचार करा.
सुखी , समाधानी , आनंदी जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पर्याय आहेत , रस्ते आहेत.

उगाचच साप साप म्हणून भुई धोपटण्यात व स्वतः चे अकल्याण करून घेण्यात काय अर्थ आहे .?

सुखी जीवनासाठी अनेक यशस्वी तंत्र मार्ग , मंत्र मार्ग , यंत्र मार्ग आपल्या आदर्श सनातन संस्कृती मध्ये सांगितलेले आहेत.

फक्त आपल्याला ते मार्ग सापडले पाहीजेत.आणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मार्ग दाखवणारा एक निस्पृह , आदर्श माणूस आपल्याला सापडला पाहिजे.

ब-याच वेळा तो आपल्या जवळ असुनही आपलं कर्म झोपलेलं असल्यामुळे आपल्याला त्याची खरी किंमतच कळत नाही.
आणि वेगवेगळ्या शंका कुशंकानीं आपले विनाशकारी मनंच त्याच्या पर्यंत पोचू देत नाही.

पैसा असला पैसा दिला तरच नातं ? अन्यथा नातं खतम ?
असे अनेक प्रकार वाढत आहेत.
असली नाती किती दिवस टिकणार ?

त्याच्याही पलीकडे जाऊन भव्यत्व , दिव्यत्व असतं यावरही विश्वास हवा.

झोपडीही असली तरी चालेल पण तिथे सुख ,समाधान, शांती, आनंद , परोपकार, एकमेकांवरील दिव्य प्रेम , विश्वास , श्रध्दा असावी.
दोन वेळची भाजी भाकरी जरी असली तरी चालेल , पण आपापासात उच्च कोटीचे प्रेम असावे,
असे घर म्हणजे धरतीवरील साक्षात स्वर्ग असतो.व अशा घरात देवीदेवताही अदृश्य रूपाने आनंदात राहतात.
व आई महालक्ष्मी पण प्रसन्न चित्ताने अहोरात्र तिथे नांदते.
आई आपल्यावर प्रेमही करते व संकटातून मार्गदर्शन करून संकटमुक्त करते.
व प्रेमानंदाने आपल्याशी बोलते पण .

*अनुभव घेऊन तर बघा.*
*एकमेकावर देवते सारखे* *दिव्य प्रेम* *करून तरी बघा.*

दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.

पण आज समाजातला विश्वसच संपला आहे.
तिथे देवत्व कसे राहणार ?
आणि स्वर्गीय दिव्य प्रेम तरी कसे मिळणार ?
आणि देवमाणसे तरी कशी सापडणार ?
ती ही लांब लांबच पळून जाणार.

बजबजपुरीचे थैमान.
भयंकर धर्म ग्लानी , धर्म संकट हेच आजचे समाजाचे विदारक चित्र आहे.

असो.आखिर कर्म अपना अपना.

*सबका कल्याण हो.*
*सबको संन्मती हो.*

*जय हरी विठ्ठल.*
*हरी ओम*
*श्रीकृष्णार्पणमस्तु*

🙏🙏🙏🕉️🚩

Related Post

Translate »
error: Content is protected !!