
*कर्मगतीचे फेरे…*
✍️ २७५०
*विनोदकुमार महाजन*
🎡🎡🎡🎡🎡
प्रत्येक मनुष्याला नेहमीच असे वाटते की ,
आपल्या जीवनात नेहमीच सुख, समाधान, शांती, आनंद ,धनाची प्राप्ती असावी.
आपले एक छान जीवन असावे.
प्रत्येकाचे सुखी जीवनाचे एक स्वप्न असते.
आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी तो रात्रंदिवस धडपडत असतो.
प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो.
पण होते नेमके उलटेच.तो जसजसा सुखाची अपेक्षा करत जातो तसतसा सुखी होण्यासाठी अधिकाधिक धडपडतो.सुखी होण्याचे अनेक रस्ते शोधत राहतो.
पण घडते ते नेमके उलटेच.तो सुख शोधण्याचा प्रयत्न करतो.पण दु:खाच्या गर्तेत नेहमी अडकत राहतो.
एक दुष्ट चक्रव्यूह.या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी तो अहोरात्र धडपडतो.पण वरचेवर दु:खाच्याच खोल गर्तेत अडकत राहतो.
कितीही प्रयत्नवादी राहूनही दु:खाचे फेरे , एक शापित जीवन यातून कांहीं सुटका होत नाही.
अन् यामुळे मनाची हताशा , उदासिनता , एकाकीपण वाढत जाते.
नेमके असे का घडते ?
कर्मगती !
कर्मगतीचे फेरे फार भयंकर व विचित्र असतात मित्रांनो.
संचित कर्म, प्रारब्ध.
एक भयंकर शापीत जीवन.
यातून कुणाचिही सुटका नाही.
मनुष्य जन्म धारण करणा-या प्रत्येकाची.
व मानवी देहात येणाऱ्या प्रत्यक्ष भगवंताची पण.
म्हणून तर श्रीकृष्णाच्या अवतार कार्याची समाप्ती पारध्याचा बाण लागून झाली.
रामाला ही शरयू नदीत देहत्याग करावा लागला.
माता सितेलाही धरणी मातेशी एकरूप व्हावे लागले.
यावर एक कथा सांगतो,
एक महासिध्द योगी होते.कठोर तपश्चर्या करून त्यांनी अनेक सिध्दी प्राप्त केल्या होत्या.
त्यांनी एक प्रण केला होता.एक शूभ संकल्प केला होता.
जग बदलण्याचा.
त्यासाठी ते गायत्री मातेची रात्रंदिवस कठोर तपश्चर्या करून इक्षीप्त साध्य व्हावे म्हणून प्रयत्नरत होते.
अत्यंत कठोर तपश्चर्या करूनही त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते
अथवा गायत्री मातेचा आशिर्वाद ही मिळत नव्हता.
अथक प्रयत्न करूनही त्या महापुरूषाला यश मिळत नाही म्हणून ते हताश, उदास झाले अन्
गायत्री मातेला मनोमन प्रार्थना केली की ,
” हे माते मी कंटाळून माझा जग बदलण्याचा संकल्प सोडून देत आहे.
इथून पुढचे आयुष्य मी जंगलात जाऊन , एकांत वासात घालावेन .”
असे म्हणून ते कायमचे जंगलात निघून गेले.
कांहीं दिवसांनंतर प्रत्यक्ष गायत्री माता त्यांच्या समोर प्रकट झाली अन् म्हणाली ,
” तुला काय हवे ते माग बेटा , मी तुला प्रसन्न झाले आहे.”
त्यावर ते महासिध्दयोयी उत्तरले ,
” आई मला सर्वप्रथम हे सांग की तु यायला एवढा उशीर का केलास ? मला आता तुझ्या कडून कांहीही नको आहे.”
त्यावर आई उत्तरली ,
” बेटा तुझ्या गतजन्मीच्या पापाचे डोंगर एवढे मोठमोठे होते की , तुला सहायता करण्याची माझी इच्छा असुनही मला तुझ्यासाठी धावत येता येत नव्हते.
आता ते पापाचे डोंगर तुझ्या शुद्ध आचरणाने संपले आहेत.तुला आता काय हवे ते माग .”
त्यावर तो महात्मा उत्तरला ,
” आई आता खूप उशीर झाला आहे , मला आता कांहीही नको आहे.”
अर्थ बोध समजावून घ्या मित्रांनो.
आपण कितीही प्रयत्न केले , दुःख मुक्त होण्याचा कितीही आटापिटा केला , सुखी जीवनासाठी कितीही धडपडलो तरी आपल्याला यश का मिळत नाही ?
याचे मर्म वरील कथेवरून लक्षात येईल.
कर्माचा बोझ , कर्मगतीचे फेरे , प्रारब्ध भोग कधिही, कुणालाही चुकत नाही.
या कर्म गतिच्या फे-यामुळेच चौ-यांशी लक्ष योनीमध्ये सुध्दा फिरावे लागते.
यातून कुणाचिही सुटका नाही.
यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे,
*अखंड ईश्वरी चिंतन व* *गुरूमंत्र जप.*
सतत सत्याच्या करणे व ईश्वरी चिंतन करत रहाणे एवढेच आपल्या हातात आहे.
*अवधूत चिंतन श्री* *गुरूदेव दत्त….*
*सद्गुरू आण्णा की जय*
*शुभं भवतू…*
*कल्याण मस्तु*
*सुखी भव*
*यशस्वी भव*
👆✋✋✋🕉️
