
*हेकेखोर ?*
✍️ २७४८
समाजात कांहीं माणसे अशी कांही हेकेखोर , भांडखोर , विचित्र , विक्षिप्त असतात की ,
दुस-याचं कितीही खरं असलं तरी ते इतरांच मुळीच ऐकून घ्यायलाच तयार नसतात.
मी म्हणजेच ब्रम्हदेव आणि सगळ्यांनी खोटं जरी असलं तरी माझंच ऐकलं पाहिजे आणि मी म्हणतो तेच खरं आणि ते सगळ्यांनीच ऐकलंच पाहिजे , अशा वृत्तिची माणसं काय दुस-याच भलं करणार ?
प्रत्यक्ष ब्रम्हदेव जरी त्याच्या कल्याणासाठी स्वर्गातून येऊन त्याच्या जवळ गेला तर तोही पळून जाईल , अशी अवस्था.
अशाचं काय कल्याण करणार डोंबलं ?
*विनोदकुमार महाजन*
