Wed. Jan 7th, 2026

जावे ज्याच्या वंशा

Spread the love

*जावे ज्याच्या वंशा*

सुख प्राप्तीसाठी , यश प्राप्ती साठी , ऐश्वर्य प्राप्तीसाठी , सुखाचे अनेक अमृत सागर प्राप्तीसाठी संकट रूपी विषाचे अनेक सागर पार करावे लागतात , अनेक जहरील्या सापांचे जालीम जहर पचवावे लागते , तेंव्हा काळावर , नशीबावर , कर्मगतीवर , संचितावर विजय मिळवून हवे ते साध्य करता येते .

अनेक वर्षे ईश्वरी कठोर अग्नी परीक्षेत जळावं लागतं .
अनेक खडतर व कठोर ईश्वरी सत्व परीक्षा द्याव्या लागतात.

तेंव्हा कुठे पाहीजे ते सगळंच मिळतं.असाध्यही साध्य होतं.

सर्वोच्च स्थान , सर्वोच्च पद मिळतं .

यशप्राप्ती , धनप्राप्ती , ऐश्वर्यप्राप्ती ,सुखप्राप्ती
म्हणूनच सोपी नसते .

तेंव्हा कुठे ध्रुव बाळासारखं अढळ पद प्राप्त होतं . तेंव्हा कुठे भक्त प्रल्हादा सारखा नारसिंव्ह धावून येतो .

केवळ भूलभूलैय्याने कांहींच साध्य होतं नसतं .

जावे ज्याच्या वंशा तेंव्हा कळे .

*हरी ॐ*

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!