
*जे होते ते भगवंताचे* *इच्छेने होते…?*
✍️ २७१४
✅❓⁉️✅✅
आपल्या कडे एक म्हण आहे,
आपल्या आयुष्यात कांहीं घटना घडल्या , त्या चांगल्या असल्या अथवा वाईट असल्या तरी, साधारणतः लोकं म्हणतात की,
” चला , जे कांहीं घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडले , व जे कांहीं घडले ते चांगल्या साठी
घडले! ”
तात्पर्य : – आपण आयुष्यात कधीही हताश , उदास न होता , प्रत्येक प्रसंगात , संकटात खंबीरपणे तोंड देऊन बाहेर पडावे.
तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात नेहमीच चांगल्या वाईट घटना घडत असतातच. आपण या सगळ्या घटना मागे टाकून पुन्हा आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो.
पण ब-याच वेळा काय होतं की , आपल्या आयुष्यात अशा कांहीं भयंकर घटना घडतात की , आपण पूर्णपणे कोसळून , उन्मळून पडतो.
अशा असह्य घटनांमुळे ब-याच वेळा अनेक जणांचे आयुष्याचं पार उध्वस्त होते.तर कांही जणांना संबंधित घटना असह्य झाल्यामुळे भयंकर ताण येऊन त्याला हार्ट एटैक येतो , अन् दुर्देवाने त्यातच त्याचा अंत होतो.
आपल्या आसपास अशा घटना नेहमीच घडत असतात.त्यामुळे अशा भयंकर घटना सहन करण्यासाठी सुध्दा आपली नेहमीच खंबीर मानसिक तयारी असावी लागते.
आज समाज पूर्णपणे दूषित झालेला आपण पाहतो आहोत.कुणाचं चांगलं झालेलं एखाद्याला पहावत नाही.
आणि मग सुरू होतात असह्य षड्यंत्र आणि त्याला सतत तोंड देणे.व त्यातून निर्माण होणारे मानसिक ताणतणाव.
विशेषतः आपल्या हिंदू समाजाला एक शाप असावा, असे वाटते.आपला हिंदू समाज हा अनेक शतकांपासून हलक्या कानाचा आहे.याचा अचूक फायदा मूगल, इंग्रज यांनी तर घेतलाच.पण अनेक वर्षे आपल्यावर राज्य केले आणि आपणाला गुलाम देखील बनवले.
आपण नेहमीच पाहतो की , अल्पसंख्याक समाज नेहमी आपल्या बहुसंख्यक समाजावर राज्य करत आला आहे.
आणि भयंकर अत्याचार देखील.
आणि आपल्याला त्याचं कांहीं विशेष वाटतच नाही.
कारण आपला समाज बहुसंख्यक असुनही हलक्या कानांचा असल्यामुळे , कोणी कांहीं जाणीवपूर्वक व भरवून सांगितले की , आपण त्यावर पटकन विश्वास ठेवतो.अगदी त्याची शहानिशा न करताच.
अर्धवट माहितीच्या आधारे आपण एखाद्याला गुन्हेगारांच्या पिंज-यात उभे करतो.तो संबंधित माणूस खरा आहे की खोटा याची आपण कधी शहानिशाच करत नाही.
हा खरंच आपल्या रक्तातलाच दोष आहे का ?
एखादा संत , महात्मा , साधू , सत्पुरुष धर्म कार्य वेगाने करून ते कार्य उत्तुंग पणे अंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवेत असेल तर , लगेच अधर्मी लोकांकडून भयंकर विषारी षड्यंत्र रचली जातात आणि संबंधित व्यक्तिचा अकारण बळी दिला जातो.
अशावेळी आपण आपल्याच संबंधित सत्पुरूषांच्या पाठीशी खंबीरपणे न उभे राहता त्या महापुरूषालाच दोषी ठरवून त्याची निंदा नालस्ती करून त्याला बहिष्कृत करतो.त्यामुळेच त्याचे महान धर्म कार्य अथवा सामाजिक कार्य झाकोळले जाते.अनायासे सत्य झाकले जाते.आणी धगधगते सत्यही खोल जमिनीत गाडले जाते.
याला जबाबदार कोण?
समाजरचना ? की हलक्या कानांचा समाज ? की हलक्या कानाची लोकशाही ?
अकारण एखाद्याच्या आयुष्याशी खेळण्याचा खरोखरीच आपल्याला अधिकार आहे का ? हे कोणी तपासून बघतच नाही.
त्यामुळे सततचे भयंकर धर्म संकट आपल्या कडे कधी संपतच नाही.आणी आपल्याला याची एक टक्का ही खंत वाटत नाही.
अशा भयंकर व विचित्र घटनांमुळे समाजात व इतिहासात भयंकर मोठी धर्म हानी झालेली आपण पाहतो.
दुर्देवाने समाजात हेच चाललेले आहे.
लाथाळ्या, कुरघोड्या , टोकाचे आपसी कलह , हेवेदावे , द्वेष , मत्सर यासारखे मानसिक आजार ,यामुळे समाज आजही त्रस्त आहे.आणी विशेष म्हणजे यांच्याशी कुणाला कांहीही घेणंदेणं नाही.
आजही एखाद्या लग्न समारंभात किंवा मृत्यू समयी एक झाले तर ,उकाळ्या पाखाळ्या उपसून काढून भांडत बसणा-या अहंकारी समाज मनास एकत्र कसे आणायचे, हा मोठा अनुत्तरित यक्षप्रश्न आहे.
याउलट दूसरे धर्मीय धर्म वाढवण्यासाठी एक होऊन अनेक पर्याय सतत शोधत असतात.
एखादा अकारण आयुष्यातून उठतो आहे , बरबाद होतो आहे , याच्याशी कुणाला कांहीही घेणंदेणं नाही.
हे आजचं ही समाजातील विदारक चित्र आहे.व यावर आजही यशस्वी तोडगा सापडत नाही.
दूर्देव….
सावरकरांचं हिंदुत्वाचं कार्य असंच थांबवल गेलं.सुभाषचंद्र बोस , लालबहादूर , पटेल यांनाही असंच अडचणीत आणलं गेलं.
अनेक साधुसंतांनाही बलात्काराच्या खोट्या केसेस मध्ये अडकवून संपवलं गेलं.सनातन धर्माचं कार्य थांबवलं गेलं.
आणि आपला हलक्या कानाचा समाज ही साधुसंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचा सोडून , धर्मद्रोही , विनाशकारी , षड्यंत्रकारी यांच्या पाठीशी उभा राहिला.
आणि ओघानेच धर्म कार्य थांबवलं जावून धर्माची अपरिमीत हानी झाली.
समाजात आजही हेच चालू आहे.
कोणीही उठतो आणि एखाद्या चांगल्या माणसांवर बेछूट आरोप करतो आणि आपला समाजही याची शहानिशा न करताच ते ग्राह्य धरतो.
उद्या माझ्यावरही माझे स्वकीयच असे घनाघाती आरोप करून , मला बदनाम करून , माझे ईश्वरी कार्य कोणी थांबणार असेल अथवा तसा कोणी प्रयत्न करणार असेल तर ?
अशावेळी ज्या समाजाच्या भल्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो,तो समाज आपल्या पाठीशी न उभे राहता, गुन्हेगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो.
व सत्याशी आणि सत्य वादी , धर्म प्रीय व्यक्तिंच्या आयुष्याशी बिनदिक्कत पणे खेळत राहतो.
अशी भयावह समाज रचना बदलण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल , याचा मात्र कोणीही विचार करताना दिसत नाही.
शेळी जाते जिवानिशी
खाणारा म्हणतो वातडं
हिंदू समाज एकसंध होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न शील असणारा ,
आपलाच,
अंतरराष्ट्रीय पत्रकार ,
*विनोदकुमार महाजन*
🙏🙏🙏🙏🙏
