*असं का ???*
✍️ २५६६
आजकाल…
कुणी कुणाला समजावून घ्यायलाच तयार नाही.
जो तो एकमेकांच्या विकपाँईंटवर हमले करतोय.
प्रत्येकजण एकमेकांशी तडजोड करतोय , अन् ?
एडजेस्टमेंट करतोय ?
हे असलं जगणं अन् हे
असलं प्रेम ?
प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी
अनेक मुखवटे धारण करून जगतोय.
अन् जगण्यासाठी केवीलवाणा धडपडतोय
माणूस ?
जीवनाचा नैसर्गिक आनंदच संपला ? ते खळखळून मनसोक्त , मनमोकळं हसणं, गप्पांची मनसोक्त, मनमुराद मैफिल हे सगळंच गायब झालं ?
एकमेकाची ओढ , प्रेम , आत्मीयता कुठं गायब झालं सगळंच ?
माणसं एकमेकापासून मनानं दूर दूर चालली.
एकटं , एकाकी पडू लागली.
का बरं असं झालं ?
द्वेष , मत्सर , नींदा खूपच वाढतय ?
लोकसंख्या वाढली पण माणूस मात्र एकाकी पडत चालला.
काय झालंय माणसाला ?
हरी बोल
*विनोदकुमार महाजन*