Wed. Oct 30th, 2024
Spread the love

अखंड सावधान !!
✍️ २५१६

कुणावर उपकार करताय ?
मानवतेच्या नात्यातून इतरांना
सहकार्य करताय ?

थांबा…विचार करा…
समोरच्याची आधी परीक्षा घ्या.
मगच सहकार्य करा
अन्यथा ??
फसगत होऊ शकते.

या घोर कलियुगात तुम्हाला बरबाद करण्यासाठी अनेक मनुष्यरूपी जहरीले साप जाळं लावून बसलेले आहेत.

ज्याच्यावर उपकार करताय
तोच उद्या सापासारखा फना काढून तुमच्या समोर उभा राहू शकतो.
आणी दंशही करू शकतो.

दुष्ट , कृतघ्न , बेईमान ,स्वार्थी , मतलबी , ढोंगी लोकांपासून हमेशा सावध रहा.
असे लोकं तुमचे मानसिक , शारीरीक , आर्थिक सोशनही करू शकतात.

तुमचा दयाळू , मायाळू , प्रेमळ स्वभावच तुम्हाला नडू शकतो.

त्यामुळेच संत सज्जन सांगतात
” अखंड सावधान ! ”
वेळ फार वाईट आहे. कलियुगाचं विनाशकारी वादळ भयावह आहे.
या विनाशकारी वादळात स्वत:च अस्तित्व टिकवून ठेवायलासुध्दा दररोजच आणी पावलोपावली तारेवरची कसरत करावी लागते.
कोण ? कधी ? कुठे ?
घात करील याचा भरवसा नाही.

सदैव डोळसपणे जगणे हेच
सर्व समस्यावर उत्तर आहे.

पटलं तर घ्या , नाहीतर ?
सोडून द्या .
वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात अर्थ नसतो.

वेळीच सावध झालेलं केंव्हाही चांगल.

हिंदू धर्माचं सुध्दा आजवर बेसावधपणामुळे खूप मोठं नुकसान झालं आहे.
आपण बेसावधपणे अनेक भूप्रदेश हरवून बसलो आहोत.
आता तरी सावध व्हा.

थोर राजा शिवछत्रपती यांची निती वापरून हिंदवी स्वराज्याची शान वाढवा.

जय श्रीकृष्ण.
हर हर महादेव.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!