Sat. Jul 13th, 2024

राजगुरु नगर येथे वृक्षारोपण संपन्न

Spread the love

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अरींजय फाउंडेशनचा ३५० वृक्षारोपणाचा उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अवचित्य साधून पर्यावरणाची बांधिलकी जपण्याच्या हेतून अरिंजय फाउंडेशनच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध गावांमधे ३५० वृक्ष लागवड करण्यात आले.तयारी म्हणून १ महिन्या आधीच कोहिनकर वाडी , डूम्या डोंगर, वाफगाव, जऊळके , सुरकुंडी , शिरोली या गावांमध्ये खड्डे घेण्यात आले होते.
आज दि. २० जून रोजी कोहिनकरवाडी, वाफगाव, जऊळके या ठिकाणी एकूण ३५० वृक्ष लागवड करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अरींजय फाउंडेशन काम करत असून पर्यावरण,गरीब कल्याण,रोजगार निर्माण,संस्कृती जतन,महिला सशक्तीकरण विषयात काम करत आहे.पहिल्या टप्प्यातील वृक्षारोपण करण्यात आले असून असे एकूण ५ टप्प्यात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे अरींजय फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.सदर अभियानात अक्षय प-हाड,मयूर भगत ,ओंकार सोनार,सहदेव राजपुरोहित,मयूर गायकवाड,अक्षय कुलकर्णी,गजानन बाभुळकर,सिद्धेश भोसले,सिद्धेश सोनार,वैभव माने इत्यादी स्वयंसेवक अभियानात सहभागी होते.सदर अभियानात वनविभागाचे अधिकारी श्री. रौंधळ साहेब,फफाळे साहेब,तांबे साहेब यांचे सहकार्य लाभले.

संकलन : गिरीश चावरे

Related Post

Translate »
error: Content is protected !!