Sat. Jul 13th, 2024
Spread the love

*माझा भगवंत*

माझा भगवंत
सगळ्यांना पुरून उरलेला आहे.
सगळ्या ब्रम्हांडात भरून उरलेला आहे.
प्रल्हादाच्या रक्षणासाठी धावत येणारा प्रल्हादाच्या अत्याचारी बापालाही न सोडणारा व टरटरा फाडून काढणारा माझा नारसिंह माझ्या रोमारोमात अहोरात्र भरलेला आहे.
गुरू दत्तात्रेयासह माझे सद्गुरू आण्णा माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवून मला यशस्वी वैश्विक कार्यासाठी आशिर्वाद देतात ते माझे आण्णा रात्रंदिवस माझ्या रोमारोमात भरलेले आहेत .
सापासारख्या भयंकर विषारी शत्रुवर तुटून पडण्यासाठी माझा हनुमंत माझ्यासमोर अहोरात्र उभा आहे.
” कशाला रडतोस ? कशाला काळजी करतोस ? कशाला चींता करतोस ? मी आता तुझ्या घरी रहायला आलेली आहे ” असे म्हणून माझ्या डोक्यावरून वात्सल्याने हात फिरवणारी ,माझे अश्रू पुसणारी साक्षात जगदंबा , माझी खरी आई
कोल्हापूर निवासी माता महालक्ष्मी माझी अहोरात्र चींता करते तर मग माझे हितशत्रु माझे काय वाकडे करणार आहेत ?
दस-याच्या खंडेनवमीचा , शस्त्रपूजनाचा , आई सिध्दीदात्रीच्या प्रत्यक्ष वरदानाचा हा दिवस माझा जन्मदिवस आहे तर मग माझ्या धधगत्या तेजस्वी ईश्वरी शक्तिपुढे माझ्या दुष्ट हितशत्रुंचा माझ्यापुढे काय निभाव लागणार आहे ?

” फार मोठे नाव कमावशिल असा आशिर्वाद देऊन , तुझे यश चालू झाले आहे ” असे म्हणून माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवणारे शेगांव चे गजानन बाबा माझी रात्रंदिवस चींता करतात , सज्जनगडावरील रामदास स्वामी , त्यांचे सर्वश्रेष्ठ शिष्य , कल्याण स्वमींना माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवायला सांगतात , तर मग मला चींता कसली ?

गौमाता सुध्दा स्वप्नात येऊन प्रेमळ भाषेत माझ्याशी प्रेमाने बोलते. मी तिचंही लेकरू.
मला वात्सल्याने तिचे स्तनाचे दूध पाजते.
किती भाग्यवान मी ?
अन् कांही माणसं माझा सतत , निष्कारण द्वेष करत राहतात ?

वैश्विक सनातन धर्माच्या यशस्वितेसाठी प्रत्यक्ष भगवंतानेच मला धरतीवर पाठवले आहे तर मग माझे रस्ते कोण अडवू शकणार आहे ?
कृष्णावतारी माझा आळंदीचा ज्ञाना मला त्याच्या समाधीजवळ घेऊन जातो अन्
” विश्व स्वधर्म सुर्ये पाहो ” च्या यशासाठी मला एक मोठे फळ देऊन मला आशिर्वाद देतो तर मग ? माझ्या वाटेत काटे टाकण्यात कोण यशस्वी होणार आहे ?
कार्यसफलतेसाठी माझा सोनारीचा काळाचाही काळ ,काळभैरवनाथ ,माझी कुलदेवता , सत्वगुणप्रधान बालरूपात येऊन माझ्या हातावर धन ठेवतो तर मग माझे वैश्विक कार्यासाठी लागणारे धनाचे रस्ते कोण अडवणार आहे ?
माझा कारीचा खंडोबा , ग्रामदैवत माझ्या गळ्यात , म्हाळसा माझ्या गळ्यात रूद्राक्षाची माळ घालत असताना तीला थांबवून माझ्या गळ्यात स्वतः च्या हाताने म्हाळसासमोर तुळशीची माळ घालून विष्णूच्या वैश्विक कार्याचा आशिर्वाद देतो तर मग
“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो ” चे
माझे वैश्विक कार्य कोण अडवू शकणार आहे ?

【 संपूर्ण धरती से अधर्म का अंधेरा छटेगा और ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म का उजाला होकर ही रहेगा !
और यह दिन भी दूर नही है ! 】

मला निष्कारण पीडा देणारे कितेक यमसदनी गेले , देशोधडीला लागले , नारकिय जीवन जगले , मला दंश करण्यासाठी येणारे कित्येक मनुष्य रूपी जहरीले साप नामशेष झाले.
मला निष्कारण बदनाम करणारे ,स्वतः बदनाम होऊन संपून गेले.
म्हणून सांगतो
सत्याला आणी सत्याचरणी लोकांना छळू नका.त्यांचा मानसिक छळवाद करून निष्कारण आयुष्यातून उठू नका.
सहकार्य नका करू ,पण कमीत कमी नरकयातना तरी देऊ नका.त्याला रडवू तरी नका.
नाहीतर ईश्वर तुम्हाला आयुष्य भरासाठी रडवल्याशिवाय राहणार नाही.

जो माझ्यावर निरपेक्ष प्रेम करतो
त्याचे कोट कल्याण होते.
जो माझा द्वेष करतो तो बरबाद होतो.
द्यावे तसे घ्यावे हा सृष्टिचा नियम व ईश्वरी सिध्दांत इथे लागू पडतो.

सत्याला छळू नका.
सत्यावर प्रेम करा.
ईश्वरावर प्रेम करा.

गौमातेचे रक्षण करा.
गंगामातेवर प्रेम करा.
गीतामातेचे आचरण करा.
आयुष्य सुखी , समाधानी ,आनंदी होईल.
जय श्रीकृष्ण

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!