जय श्रीराम
प्रेस नोट:-
संपूर्ण देश नुकताच कोरोना महामारीतून बाहेर पडतोय तेच शेतकऱ्यांच्या पशुधनावर लम्पी सारख्या भयानक आजाराने आघात केला आहे.खेड पंचायत समिती अंतर्गत अपुऱ्या पशु वैदकीय अधिकारी संख्याबळ असल्याने गावोगावी लसीकरण योग्य वेळेत पूर्ण होत नसल्याने विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शहर व ग्रामीण प्रखंड यांनी तालुक्यात ज्या ठिकाणी लसीकरण होत नाही अश्या सगळ्या गावांमध्ये घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्धार केला आहे.
आज दि.१८.०९.२२ रोजी चांदुस या संपूर्ण गावात ६० ठिकाणी घरोघरी, रानात जाऊन लसीकरण करत अभियानाला सुरवात केली.सदर अभियानात वि.हीं.प – *बजरंग दलाचे* दीपक गावडे,अक्षय प-हाड,अनिकेत वाळुंज,मयूर सावंत,तुषार मांडेकर, वैभव बिडवे,गणेश शिंदे,अंकुश लवंगे, दीपक लवंगे ,ऋषिकेश बिडवे तेजस भानुसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
कसायांच्या तावडीतून गोवंश रक्षण करण्याप्रमाणेच महामारीच्या विळख्यातून गोवंश रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून ज्या ज्या वेळी देव देश धर्मावर संकट येईल त्यावेळी आम्ही सगळ्यात पुढे उभे राहूण कार्य करू असे वि हीं प बजरंग दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
वृत्त संकलन : – गिरीश चावरे,राजगुरु नगर ( खेड )