Wed. Dec 11th, 2024

राजगुरू नगर येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

वृत्त
पशु संवर्धन व उपचार केंद्र राजगुरूनगर येथे तालुक्यातील विविध भागातून शेतकरी आपली जनावरे उपचारासाठी घेऊन येत असतात , परंतु दवाखान्यात जनावरांना उतरवण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने जनावरांना दुखापत होत आहे.जनावरांचे पाय मोडन्यासारख्या गंभीर घटना घडत असूनही प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.आज दि.1.02.22 रोजी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाकडून अतिरिक्त पशु संवर्धन आयुक्त डॉ.पोखरकर व सहकारी डॉ .दूशिंग यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली आहे अन्यथा भविष्यात एक भव्य शेतकरी आंदोलन उभे करणार असल्याचे सांगितले . यावेळी बजरंग दलाचे गणेश रौधळ, वीरेंद्र भागवत, अक्षय प-हाड,योगीराज करवंदे, निखिल थिगळे , केतन थिगळे इ उपस्थित होते.

 

वृत्त संकलन : – गिरीश चावरे,राजगुरु नगर

Related Post

Translate »
error: Content is protected !!