Sat. Oct 5th, 2024

राजगुरू नगर शहरात एकवटला हिंदू समाज

Spread the love

अधिकृत वृत्त. ( संकलन : – गिरीश चावरे , राजगुरू नगर )

*खेड तालुक्यात एकवटला हिंदू समाज*

संभाजी ब्रिगेड च्या वक्त्याने मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम,श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यावर अतिशय गलिच्छ शब्दात टिप्पणी केली.
सदर घटनेच्या निषेधार्थ आज खेड तालुक्यात राजगुरुनगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता भारतमाता व्यासपीठ मोती चौक येथे झाली.
हिंदूंच्या सहिष्णुतेचा फायदा घेणे बंद करा अन्यथा शास्त्र प्रमाणे शस्त्र उचलायला समाज समर्थ असून अश्या समजकंटकांना उभे गाडन्याचे समर्थ हिंदूंमध्ये असल्याचे विश्व हिंदू परिषद चे विभाग मंत्री नितीन जी वाटकर यांनी सांगितले.प्रस्तावना भाजपा तालुका सरचिटणीस अक्षय प-हाड करून ज्ञानेश महाराव जेव्हा खेड तालुक्यात येईल तेव्हा त्याला अद्दल घडवल्याशिवय शांत बसणार नाही असे सांगितले.रा स्व संघाचे तालुका कार्यवाह अमित खेडकर यांनी आभार मानले.हिंदू धर्म रक्षणाची प्रार्थना घेऊन स्वामी समर्थ सेवेकरी दीपक सातपुते यांनी समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री मयूर सावंत यांनी केले.
श्री स्वामी समर्थ परिवार राजगुरुनगर चे
श्री. राहुल मांजरे, श्री.स्वयंभू ढगे, श्री. निलेश टाव्हरे ,श्री.अमोल खैरे, श्री.रुपेश कहाणे , श्री.मंगेश कहाणे.श्री.समीर धुमाळ आणि संदेश जाधव,कल्पना गवारी, मेजर.श्री महेंद्र दौंडकर,सर्व गणेश मंडळे व सामाजिक संस्था यांनी उपस्थित राहून विशेष नियोजन केले.

Related Post

Translate »
error: Content is protected !!