निखिलजी नमस्कार,
आपण काल जो प्रस्ताव मांडला तो अतिशय उत्तम होता. आपल्या भविष्यकालिन योजना चांगल्या असतील व त्यातून समाजाचे भले होईल याबाबद्दल ही खात्री आहे.
आपली अनेक क्षेत्रात ओळख आहे, अनेक स्नेही मंडळी भोवती आहेत, तरी या कार्यात ट्रस्टी म्हणून आपण माझ्या नावाचा विचार केला याबद्दल प्रथमतः मनापासून धन्यवाद ! या कार्यात सहभाग घेणे ही खरेतर भाग्याचीच गोष्ट आहे.
निखीलजी, आपल्यावर विश्वास आहे आणि आपण दाखवलेल्या विश्वासाचाही मनात आदर आहे. परंतु सध्या काही गोष्टी हातात घेतल्या आहेत. काही कमिटमेंट केल्या आहेत, त्यामुळे आपण देत असलेल्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकणार नाही. तसेच सध्या हातात असलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे हे मी माझे कर्तव्य समजते. सर्व ठिकाणी एकाच वेळी राहिल्यास कुठेतरी पारडे कमी जास्त झुकू शकते, त्यामुळे आपणास विनंती आहे
‘ ट्रस्टी’ म्हणून आपण माझ्या नावाचा विचार करू नये !
आपल्या कार्यात इतर काही मदत लागली तर मी ती करेन, मला स्वयंसेवकाच्या भूमिकेत राहू द्या !..
आपण माझी ही विंनती मान्य करावी व त्याप्रमाणे पुढील योजना आखाव्यात !🙏
मनुष्य जेव्हा ध्येयाच्या दिशेने पुढे जातो आणि निस्वार्थी मनाने प्रयत्न करतो ते कार्य नक्कीच यशस्वी होते.
आपणास आपल्या कार्यात यश मिळो !
योजिलेले सर्व कार्य उत्तम प्रकारे पूर्ण होवो !
आपल्या कार्यास मनापासून शुभेच्छा !…💐🌹
– मनिषा नाईक