Sun. Jan 18th, 2026

नाते ह्रदयाचे

Spread the love

*भावनीक नाते*
✍️ २७६६

*विनोदकुमार महाजन*

🌹🌹🌹🌹🌹

मन , भावना प्रत्येकालाच असतात.अगदी पशुपक्षांनां सुध्दा.
फक्त त्या ओळखून आपल्याला त्यांना आनंद देता आला पाहिजे.

देव जरी मानवी देहाने धरतीवर अवतरले तरी त्यांनाही मन , भावना असतातच.जरी ते जितेंद्रीय असले तरीसुद्धा.

श्रीकृष्णाचे आई वडील , वसुदेव देवकी जेंव्हा, कंसाच्या तुरूंगात होते तेंव्हा, श्रीकृष्णालाही आई वडील तुरूंगातून सोडवण्याच्या मन , भावना होत्याच ना ?

त्याचं राधेवर अन् राधेच श्रीकृष्णावर , सर्वस्व व उच्च प्रेम होतं , आजही आहे , हे पण मन , भावनेचचं प्रतिक होय ना ?

प्रिय मित्रांनो ,
आपल्यालाही, अगदी सगळ्यांना मन , भावना असतातच ना ?

आपल्याला सगळी सुख मिळावी , आपल्यावर कुणीतरी खरं , निर्व्याज , ईश्वरी प्रेम करावे , हे ही मन भावना जीवंत असल्याचंच लक्षण होय ना ?
अगदी वय वाढत चाललं तरी ?

आपण ही सगळे कुणावर तरी खूप खूप प्रेम करत असतो.
पण ते व्यक्त करता येत नसतं.
मनातल्या मनात हे ठेवतो.

पती पत्नीच प्रेम , आई वडीलाच प्रेम , मुलाच प्रेम , नात्यातल प्रेम , हे सगळं प्रेमचं होय ना ?

कधी ते निरपेक्ष असतं , तर कधी ते अपेक्षा ठेवून केलं जातं.

पण निरपेक्ष प्रेम हे सर्वश्रेष्ठ असतं.
भक्त भगवंता सारखं.
गुरू शिष्या सारखं.
माय लेकरासारखं.

लग्नाआधी सुध्दा आपण एखाद्या मुलावर अथवा एखाद्या मुलीवर खरंखुरं प्रेम करत असतोच ना ?
अगदी पवित्र ?

पण अगदी खरं प्रेम करूनही, ती किंवा तो आपला न होता ती किंवा तो दुस-याचेच होतात , तेंव्हा ती खंत आयुष्यभर सतावतेच ना ?

अगदी राधा कृष्णाला सुध्दा.

पुन्हा दोघांच्या आयुष्यभर कधीही गाठी भेटी होऊ अथवा न होऊ , आयुष्यभर मनाच्या एका कोपऱ्यात ती आठवण निरंतर असतेच ना ?

हेच खरं प्रेम.
हीच मन , भावना.

पण हीच मन,भावना सद्गुरू चरणावर , ईश्वरी चरणावर सदासाठी समर्पित केली तर ?
आपण आपले अस्तित्व विसरून , त्या सद्गूरूशी अथवा त्या ईश्वरी शक्तिशी , निरंतर एकरूप होतोच ना ?

प्रेम असाव तर असं.
निरपेक्ष.संपूर्ण समर्पित.
अगदी गुलाबाच्या फुलासारखं कोमल , तरल , सुंदर , पवित्र .
ज्याचा सुगंध आयुष्यभर दरवळत रहावा.

हेच तर आत्म्याच , आत्म्यावर केलेल, खरं , पवित्र, शुध्द प्रेम असतं.
त्यात छल ,कपट कांहीही नसतं.

मंगेश पाडगावकर यांची एक लोकप्रिय कविता आहे ना ?
प्रेम म्हणजे प्रेम असतं.तुमचं आमचं सेम असतं.

*श्रीकृष्णार्पणमस्तु*

🌹🌹🌹🌹🌹

Related Post

Translate »
error: Content is protected !!