Sun. Dec 28th, 2025

फ्रेंड रिक्वेस्ट

Spread the love

*फ्रेंड रिक्वेस्ट*
✍️ २७४३

*विनोदकुमार महाजन*

👆👍👍👍👍

*फ्रेंड रिक्वेस्ट ?*
आज सोशल मिडियाचा जमाना आहे .
प्रिंट मिडिया , इलेक्ट्रॉनिक्स मिडिया जे सहजसाध्य करू शकत नाही ते सोशल मिडिया वर आज साध्य करता येते .

यातून बरीच नवी नाती जोडली जातात.
कांहीं जुन्या नात्यांना , आठवणींना उजाळा दिला जातो .

एकमेकांवरील प्रेम , विश्वास , आत्मीयता वाढवण्यासाठी सोशल मिडिया आज प्रभावी भुमिका निभावते आहे .

तर सोशल मिडियावर आज बरेच फ्राॅड , फसवणुकीचे प्रकार ही घडत आहेत.
त्यामुळे सोशल मिडिया हे आज प्रभावी माध्यम तर बनत आहेच.पण ब-याच वेळा ते दुधारी शस्त्र ही बनत चालले आहे.

या माध्यमाचा आज जसा सदुपयोग होतो आहे तसाच दुरूपयोग ही होतो आहे.

तुटलेली एकमेकाची नाती जुळणं , प्रेम जुळणं, नात्यातल्या दुरावा कमी होणं यासाठी पण या प्रसारमाध्यमाचा उपयोग होतो आहे.

अनेक बर्षे आठवणींच्या पडद्याआड गेलेले प्रिय मित्र पुन्हा या माध्यमातून एकत्र येऊन अनेक सामाजिक विधायक कार्य वाढवत आहेत.

फ्रेंड रिक्वेस्ट हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.
आपण ब-याच वेळा कांहीं मित्रांना , नात्यातल्या दुरावा संपून गोडवा वाढावा म्हणून , जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून , अथवा नवीन मित्र बनावा म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतो.
कांही मेसेजही पाठवत असतो.

पण आपल्या कडूनही ब-याच वेळा जाणते अजाणते पणे ह्या फ्रेंड रिक्वेस्ट कडे दुर्लक्ष होते तर एखाद्याला आपण ब-याच वेळा फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुनही प्रतिसाद मिळत नाही , तेंव्हा मनाची नाराजी होते अथवा गैरसमज वाढतात.

ब-याच वेळा आर्थिक फायद्यासाठी सुध्दा या माध्यमाचा दुरूपयोग केला जातो.

म्हणूनच आज सोशल मिडियाच्या जमान्यामध्ये फ्रेंड रिक्वेस्टला खूप महत्व आले आहे.

एकमेकांना संकटातून सोडवून धीर , आधार देण्यासाठी सुध्दा या प्रभावी माध्यमाचा उपयोग होतो.

पण या भुलभुलैय्याच्या माध्यमामध्ये खरे , जिवाभावाचे , जीवापाड प्रेम करणारे , जीवाला जीव देणारे खरे मित्र किती मिळतात हाही मोठा यक्ष प्रश्न आहे.?

स्वार्थापोटी एकत्र आलेले मित्र वेगळे तर एकमेकांच्या परम कल्याणासाठी एकत्र आलेले मित्र वेगळे.

ब-याच वेळा या फ्रेंड रिक्वेस्ट मधून ब-याच जणांची फसगतही होते तर कांहीं जणांना या मित्रत्वातुन एक नवीन आयुष्य ही मिळते.

या माध्यमाचा सदुपयोग जर झाला तर एखाद्याचे उध्वस्त झालेले आयुष्य ही पुन्हा बहरते तर दुरूपयोग जर झाला तर अनेक जणांचे आयुष्य उध्वस्त ही होते.

म्हणूनच आज सोशल मिडिया वर आज फ्रेंड रिक्वेस्टला खूप महत्वपूर्ण स्थान आहे.

*बरीच मंडळी फ्रेंड* ( *बारबार फ्रेंड रिक्वेस्ट* *भेजकर भी ?* 😂 ) *रिक्वेस्टला कच-याची* *टोपली पण* *दाखवतात.*
👆😂

म्हणूनच ते आपण स्विकारायचे की नाही ते आपल्याच हातात असते.

मनाची नाराजी , मनाची घालमेल घालवण्यासाठी सुध्दा मित्र खूप महत्वपूर्ण भूमिका निभावत असतात.
पण तो मित्र खरा असावा लागतो.

म्हणूनच एक जुनी म्हण इथे नमूद करतो…
” *आस का बाप…*
*निरास की माॅं…*
*होते की बहन…*
*जोरू साथ…*
*पैसा गांठ…*

*और ?*
**निदान का दोस्त…?* ” ( माझ्या आण्णांच्या या वाक्याचा अर्थ , ख-या मित्राला प्रत्यक्ष भेटीत सांगेन . 👍😂 )
पण सोशल मिडिया वर आज असे खरे
*निदान का दोस्त*
मिळतील का नाही हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.?

स्वार्थापोटी एकत्र आलेले मित्र वेगळे अन् निखळ प्रेमापोटी एकत्र आलेले मित्र वेगळे.

मतलब की दुनिया सारी ,
मतलब के रिश्तेनाते…
यापेक्षा पुढे जाऊन जे नाते स्वार्थ मोहाच्या पुढे जाऊन , शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहते , जे प्रेम निखळ राहते तेच खरे नाते व तेच खरे मित्रप्रेम व तोच खरा मित्र.

*पैसा मिळाला तर मित्र ?*
*नाहितर ? मित्रत्व ,* *नातंपण एकदम खतम ?*
*असलं प्रेम 🪉 काय* *कामाचं ?*

स्वार्थ मोह ,माझे तुझे , सुख दुःख याच्या ही पलीकडे जाऊन जे प्रेम केले जाते तेच खरे निखळ प्रेम असते.

*खरेच मला तुम्हाला असे* *खरे , निखळ प्रेम* *मिळेल का हो ?*
*असे खरे निखळ प्रेम* *करणारे मित्र* *मिळतील का हो ?*

ज्यांच्या संगतीत मनसोक्त हसायला,खेळायला , सुखदुःख सांगायला मिळेल ??

तरच त्या फ्रेंड रिक्वेस्टला अर्थ राहील.
अन्यथा ?
सबकुछ भुलभुलैय्या.

*याद करेगी दुनिया*
*ऐसा तेरा मेरा याराना*
ऐसी दोस्ती चाहिए ✍️👍

*जय राधेकृष्ण*

( जिवाभावाच्या , सगळ्या ख-या मित्रांना वरील लेख समर्पित )

👆🙏🙏🙏🙏

Related Post

Translate »
error: Content is protected !!