Thu. Jul 9th, 2026

आयुष्याचं गणित ?

गणित आयुष्याचे ? https://globalhinduism.in/?p=17939

*जे काही घडलं ते ?*
*भगवंताच्या इच्छेने* *घडलं…!!!*
✍️ २९००

*विनोदकुमार महाजन*

✅✅✅✅

होय…
जे काही घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडलं.
जे काही घडतं ते ही भगवंताच्या इच्छेनेच घडते.

जे काही चांगले वाईट घडतंय ते सुध्दा ? आपल्या चांगल्या साठीच भगवंताच्या इच्छेनेच घडतंय.
मग सुख असो अथवा दुःख.
सुखदुःख सुध्दा भगवंताच्या इच्छेनेच मिळतंय.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात.
अनेक सुखदुःखाचे डोंगर अगदी प्रत्येकालाच पार करावे लागतात.
मला तुम्हाला अगदी सगळ्यांना.
अगदी दररोज.

आपल्या हातात शेवटी काय आहे ?
सगळं भगवंताच्या हातात.

अगदी प्रत्येक सजीवाचा जन्मही त्याच्या हातात.आणी प्रत्येकाचा मृत्यू देखील त्याच्याच हातात.

कुणाचा जन्म कधी कुठे कसा होणार आहे , कोणत्या योनीत होणार आहे आणी ? प्रत्येक सजीवाचा मृत्यू देखील कुठे कधी कसा होणार आहे ?
त्याचे सुखदुःख किती ?
याचे सगळे अचूक हिशोब त्या भगवंताकडे आहेतच.

अगदी सुर्य चंद्र , अख्खे सृष्टी चक्र देखील त्याच्या अधीन आहे.
मग मनुष्य प्राणी ?
किस झाड की पत्ती…
य: कश्चित…?
त्याच्यापुढे….?!!

तरीही अहंकारी मनुष्य प्राणी काय म्हणतो ?
माझं माझं…
मी मिळवलं , माझं धन , माझं वैभव…
माझी बायका पोरं…

माझं माझं कबाड ओझं
अरे प्राण्या ?
तुझं आहे तरी काय शेवटी ?
त्याचं बोलावणं आलं की ? एका फटक्यात सगळंच सोडून जायचं आहे.
देह सुद्धा शेवटी अग्नीत जाळून भस्म केला जाणार आहे.

अगदी आपला श्वास सुध्दा त्या भगवंताचा आहे आणी श्वासही ? त्याच्याच अधीन आहे.
त्याच्या आदेशानेच श्वास थांबला की ?
सगळं खतम्…?
एक प्रेत…

मग शेवटी तुझं आहे तरी काय ?

तुझं सत्कर्म मात्र तुझं आहे.
तुझं ईश्वरी कार्य तुझं आहे.
ईश्वरावरील अतूट श्रध्दा विश्वास प्रेम हे मात्र नक्कीच तुझं आहे.
तुझं सनातन धर्माचं अव्याहतपणे केलं गेलेलं कार्य तुझं आहे.

आणी भगवंत यामुळे ?
आनंदी होऊन , अगदी खुश होऊन , तुला जे काही पाहीजे ते सगळं सगळं तुला भरभरून देईल.
एवढी अफाट शक्ती त्याच्यात आहे , त्याच्या प्रेम , वात्सल्यात आहे.

मग त्याला शेवटी तुझ्या कडून हवंय काय ?
तुझं ह्रदय हवंय त्याला , त्याला तुझं निष्पाप निरपेक्ष प्रेम हवंय.
तुझं संपूर्ण समर्पण त्याला हवंय.

देव भावाचा भूकेला.
त्याला काय लागतं ?
त्याला काय कमी आहे ?
त्याच्या दानपेटीत तू कंजूस पणे टाकलेला एक रूपया सुध्दा त्याला नको आहे.
ना हार तुरे लागतात त्याला.

तो तर अव्याहतपणे प्रेमाचा भुकेला.
अगदी वेडा वेडा होतो तो प्रेमासाठी.
प्रेमासाठी तो अगदी दास ? पाणक्या सुध्दा होतो.

एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी वाहणारा.
अर्जुनाचे मोठ्या प्रेमाने घोडे धुणारा.
जनाबाई संगे दळण दळणारा.
चोख्यासंगे ढोरे ओढणारा.गोरा कूंभार , सावता माळी यांची काळजी करणारा.
ज्ञाना तुकाची अव्याहत चींता करणारा ?

तुला काय पाहिजे ?
तर ?
धन वैभव पाहीजे , सगळी सुखं पाहीजे , आयुष्याचं सगळं गणितच मनासारखं पाहिजे ?

तरच देव खरा…
नाहितर ?
देव खोटा…

अशान देव पावायचा नाही रं…
देव बाजारचा भाजीपाला नाही रं…

मनी नाही भाव
अन्…???
देवा मला पाव…
अशानं देव पावायचा नाही रं…
देव बाजारचा भाजीपाला नाही रं…

शेवटी ?
प्रारब्ध तशी बुध्दी आणी ?
बुध्दी तशी फळं…

*जय हरी विठ्ठल*

🙏🕉️✅🌹

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!