Tue. May 12th, 2026
Spread the love

*कशाला काळजी* *करतोस वेड्या…जीवा?*
✍️ २८५९

*विनोदकुमार महाजन*

🤔🤔🤔🤔

याची काळजी कर , त्याची काळजी कर…
काळजीतच उभं आयुष्य गेलं…

कशाला काळजी करतोस रे वेड्या जीवा…?
जे जे नशीबात आहे ते ते सगळं होणारचं आहे.
कपाळावर जे जे लिहीलं आहे ते सगळं घडणारचं आहे.
कर्मगतीचा फेरा कधी चुकणारं नाही.
सुखदुःखाचं गणितं आयुष्यात कधीच हटणार नाही.

आपल्या व्यर्थच्या काळजीनं प्रश्न कधी सुटणार नाहीत .

मग कशाला काळजी करायची ? आणी कुणाची काळजी करायची ?

जो तो आपापलं नशीब घेऊनच जन्माला येतो.
एकाच आईची अनेक लेकरं सुद्धा वेगवेगळी सुखदुःख भोगत रहातात .

त्यातला एखादा कोणी राजा होतो.
तर एखादा आयुष्यभर भिकारीच राहतो.
प्रत्येकाचा कर्मगतीचा हिशोब वेगळा , प्रत्येकाचा आयुष्याचा खेळ निराळा.

अगदी परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा रात्रीचं तुरूंगात जन्मला आला आणी ? रात्रीतुनच तुरूंगातून निसटून गेला.

स्वकीयांना समजावता समजावता प्रत्यक्ष श्रीकृष्ण सुध्दा यादवीला सामोरा गेला.
आणी ? स्वतःचा दिव्य देह सुद्धा ? त्याने ? त्या प्रभूने ?
व्याधाच्या एकाच बाणाने संपवला.

असं हे कर्माचं गणित आहे .

कर्म ? हे रामालाही चुकलं नाही , कृष्णालाही ते चुकवता आलं नाही ?
तर मग आपण कोण ?

सिध्दांतासाठी ईश्वरानेही दु:ख भोगलं , खूप दुःख भोगलं. असह्य…
मग आपण व्यर्थ चिंता करायची कशाला ?

सगळं सगळं *श्रीकृष्णार्पणमस्तु* म्हणायचं , अगदी दररोजचं म्हणायचं.
आणी दररोजचं अगदी मस्त मस्त आनंदी होऊन , ताजं ताजं जीवन जगायचं.

जे कर्मात असेल ते होईल , असं म्हणून अगदी बिनधास्त रहायचं.
हसून खेळून उभं आयुष्य मस्त मजेत घालवायचं.

लहान मुलासारखं नेहमी हसत खेळत रहायचं .

यही तो जीवन है….

*जय श्रीकृष्ण*

👍👍👍✅

Related Post

Translate »
error: Content is protected !!