
*चेह-यावर कधीही दु:ख* *दिसु देऊ नका*
✍️२७६७
*विनोदकुमार महाजन*
👍👍👍👍👍
होय मित्रांनो ,
वरील वाक्य अगदी सत्य आहे.
आपल्या चेहऱ्यावर कधीही दु:ख दिसु देऊ नका.
सतत हसतमुख , आनंदी चेहरा ठेवण्यासाठी तयार रहा.
कारण ?
दुनिया आणि दुनियादारी खरंच फार क्रूर आहे.
जागोजागी , पावलोपावली गुप्त शत्रू , हितशत्रू तुम्हाला बरबाद करायला चोवीस तास टपलेले आहेत.
कलियुगाचं थैमान भयावह आहे.
घराघरात , मनामनात कलीचा उन्मादी विनाशकारी संचार भयावह आहे.
खरं काय , खोटं काय आणि कोण खरा कोण खोटा हेच कळेनासे झाले आहे.
*मनामनात थैमान आहे.*
नातिगोती संपत चालली आहेत.स्वार्थाचा भयंकर बाजार तेजीत आहे.
पैसा हाच कलियुगाचा देव होऊन बसला आहे.
एक वेळ खरा देव आला तर तोही , उन्मत्त कलीच्या मा-यामुळे स्वर्गाला पळून जाईल , अशी भयंकर स्थिती आहे.
अधर्माचा अंधार आणि पाप्यांचा हाहाकार भयावह आहे.
संपूर्ण पृथ्वी तलावर हीच स्थिती आहे.
माणूस मेलेल्या मनाने जगतो आहे.माणुसकी मेलेली आहे.
मेलेल्या माणसाच्या दु:खावर ही आपापली स्वार्थाची पोळी लाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
खरे साधू संत भयंकर संकटात आहेत.आणि त्याच्याशीही कुणाला कांहीही घेणं देणं राहीलेले नाही.
प्रत्येक ठिकाणी
जो तो पळतोय.
जो तो पैशासाठी धावतोय.
पैशातून मिळणाऱ्या सुखासाठी धावतोय.
पैशासाठी धडपडतोय.
कुणालाही कुणासाठी ,इतरांसाठी विचार करायला , थांबायला वेळ नाही.
कलीचं भयावह विनाशकारी साम्राज्य चहुबाजूंनी पसरलेल आहे.
उन्मत्त कली आपला फास , आपला विळखा माणसाच्या गळ्याभोवती , येणकेण प्रकारें , वेगाने आवळतो आहे.
जो सत्याच्या रस्यावर चालतो आहे , त्यांच्यावर , त्यांच्या मागे , भयंकर संकटे लागली आहेत.
परिस्थिती भयावह आहे.
विनाशकारी आहे.
कुणापाशी विश्वासाने बोलायचं , कुणापाशी मन हलकं , मोकळं करायचं हा प्रश्न आहे.
प्रत्येक जण आपल्याच विश्वात वावरतो आहे.त्याला दुस-याचे सुखदुःख ऐकायला , समजावून घ्यायला वेळ नाही.
विश्वासाने कुणापाशी कांहीं बोलावे तर ? घात होतोय.
गैरफायदा घेतला जातोय.
प्रेमानेही नाटक धारण केले आहे.
पैशासाठी , सत्तेसाठी, संपत्ती साठी प्रेमाचे अनेक मुखवटे जगात वावरताना दिसत आहेत .
आतल्या आत दुखा:तिरेकाने प्रत्येक जण तडफडतो आहे.
आणि वर पुन्हा नाटकी मुखवटे धारण करून , वरपांगी खोटं खोटं हसुन , परिस्थिती वर मात करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो आहे.
ओठात एक पोटात एक
ही परिस्थिती जागोजागी पहायला मिळते आहे.
सत्य , सत्यवादी तडफडतो आहे.
सत्याचा वाली कुठेही दिसत नाही.
सत्याचा वाली ईश्वर असतो असे म्हणतात ,
पण ईश्वरालाही गाढ झोप लागली आहे की काय ? असे वाटू लागले आहे.
कारण ?
गौलोकातून आलेली त्याचीच गौमाता , तडफडून मरते आहे , मारली जाते आहे , गोपाल गोपाल म्हणून हंबरडा फोडून गौमाता , आक्रंदन करून रडते आहे ,
पण ? तिचे आक्रंदन , तिचे दु:ख , तिच्या मृत्यू यातना प्रत्यक्ष गोपालालाही दिसत नाहीत , ऐकू येत नाहीत का ?
ही वास्तव स्थिती आहे.
भगवंता तु कुठे आहेस रे ? म्हणून भक्त भगवंताला आक्रंदून हाका मारताहेत.
पण त्याला तेही ऐकू येत नाही ?
दुसरा संकटाच्या आगीत जळत असेल तर त्याला सोडवायला जायचे सोडून तो आगीत जळतो आहे म्हणून , आनंदाने पेढे वाटणा-या विकृत समाजाची विकृती , मानसिकता झपाट्याने वाढते आहे.
देवही बाजारात मांडला जातो आहे की काय असे वाटू लागले आहे.
अध्यात्माचा ही बाजार मांडला आहे.
बुवाबाजी , बजबजपुरी भयंकर वाढली आहे.
याला उत्तर काय ?
कांहीही नाही.
शून्य.
समस्या भयंकर आहेत.
समाधान शून्य आहे.
अधर्मी , विधर्मी , निधर्मी सत्यावर , सत्य सनातन वर , चौफेर अन् विनाशकारी यशस्वी हमले करत आहेत.
सत्य क्रूरपणे तडफडून , जाळून मारलं जातं आहे.
आणि बघ्यांची संख्या वाढत आहे.
उन्मादी , हसत बघ्यांची संख्या तर वेगाने फोफावते आहे.
*याला उत्तर काय ?*
उत्तर आहे.
थंड डोके.
परिस्थिती कितीही भयावह , भयंकर असली तरी सतत आनंदी राहून, हास्यमुख राहून , परिस्थिती वर मात करणे .
कितीही दुःख असले तरी ते आत दाबून, सतत आनंदी रहाणे .
कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी थंड डोक्याने विचार करून , यशस्वी होणे , अनुकूल परिस्थितीची वाट बघणे आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करून , सत्याची पुनर्स्थापना करणे.
आपले हितशत्रू यामुळे नामोहरम होतील.
त्यांच्या कागाळ्या , कारस्थाने हाणून पाडली जातील.
आणी आपल्यामध्ये सतत , चोवीस तास पाॅझीटीव्ह शक्ती जागृत राहील.
आणि प्राप्त परिस्थितीवर विजय मिळवून
*सत्यमेव जयते*
चा खरा अर्थ समजेल.
*मला फक्त जिंकायचेच* *आहे*
ही जीद्द , चिकाटी , आत्मविश्वास , प्रयत्नवाद नक्कीच
या साऱ्या भयावह परिस्थिती वर विजय मिळवून देईल.
उन्मत्त कलीचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी आता , कल्की अवतार येण्याची वाट न बघता प्रत्येकालाच आता कल्की रूप धारण करायचे आहे.
साम दाम दंड भेद निती वापरून तर कधी अदृश्य रूपाने सगळ्याच्या सगळ्या अधर्मी , उन्मादी विषारी सापांच्या जबड्यात हात घालून , त्याचे विषारी दातच कायमस्वरूपासाठी उपटून काढण्याची व अधर्मी साप सदासाठी ठेचण्याची हिम्मत असेल , तयारी असेल केवळ पाच टक्के ( पांडव ) समाज तयार असेल तर ?
*यश आपलेच आहे*
हे नक्की.
सामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचे हे सगळं आहे.
पण *असामान्य* माणसंही जगात खूप आहेत.
त्यांना एक करूया.
*वैश्विक महाक्रांती* अभियान सुरू करू या.
कक्षा रूंद करु या , क्षितीज व्यापक करू या.
जग बदलायचा संकल्प पूर्ण करू या .
वास्तव स्विकारावे लागेल.कठीण परिस्थिती वर विजय मिळवत पुढे पुढे जावे लागेल.
रामराज्याचे खरे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी जमीनीवर स्थिर होऊन, एकेक यशस्वी पाऊल उचलावे लागेल.
*यश आपलेच आहे.*
*आणि ते आपलीच वाट बघतंय.*
*बी पोझिटीव्ह*
पटलं तर घ्या , नाहीतर सोडून द्या वा-यावर .
*जय श्रीकृष्ण*
👍👍👍👍👍
