Mon. Nov 10th, 2025

कसाई अन् बोकड

Spread the love

*कसायाला बोकड* *कापल्याचे दुःख होईल* *का ?*

✍️ २७२७

💁‍♂️💁‍♀️💁

होय मित्रांनो
माझा तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे.
त्याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल.

खरंच मित्रांनो
कसायाला बोकड कापल्याचे दुःख होईल का हो ?
भयंकर विषारी साप चावून एखादा व्यक्ती मेला तर त्या सापाला तो व्यक्ती मेल्याचे दुःख होईल का हो ?

हो कींवा नाही ते तुम्हीच सांगा.

अहो
महाभारतामध्ये
अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू चा अंत झाल्यावर सुध्दा त्याच्या प्रेताला सुध्दा क्रूरपणाने हसुन लाथा घालणारे सुध्दा होतेच ना ?

कौरव पांडवांच रक्त कांहीं वेगळं होतं का ?
कशासाठी घडले एवढे सगळे भयानक महाभारत ?

महाभारत श्रीकृष्णाने घडवले की , पांडवांनी , कौरवांनी की दुर्योधनाने ?

की ईश्वरी शक्तिलाच असह्य होऊन सर्वनाश करावा लागला ?

एवढा संवेदनाशून्य समाज कसा काय बनू शकतो ?

मी समाजात आजही अशी क्रूर माणसं बघितली आहेत की , एखादा मरून पडला तर त्याच्या प्रेताला सुध्दा लाथा घालतील.अन् वर पुन्हा त्या प्रेताला सुध्दा हसतील…

प्रेतावरचं लोणी खाणे
ही म्हण आपल्याकडे सर्वश्रुतच आहेच की.
पण प्रेतालाही लाथा घालणं ?

श्वास गुदमरतो सत्पुरूषांचा असल्या भयावह वातावरणामध्ये.

आता येतो मूळ मुद्यावर.
कांहीं वर्षांपूर्वी नव्वद टक्के माणसं ही संवेदनशील होती.
एकमेकांच्या सुखदुःखात धावून जात होती.

पण आता ?
जवळ जवळ नव्वद टक्के माणसं ही संवेदनाशून्य आहेत.
इतरांच्या दुःखाचे कुणाला कांहीही घेणंदेणं राहीलेलं नाही.

बोथट मनाची माणसं.
अहो एखाद्याच्या मयताला जरी माणसं जमली तरी एकमेकांच्या ऊखाळ्या पाखाळ्या काढतील.
भांडत बसतील.

संबंधित माणूस मेल्याचे दुःख कुणालाच नाही ?
कुणाच्या चेहऱ्यावर तसा भाव पण नाही ?

कोण मेला अन् कोण जगला ?
कुणाला कांहीच सोयरसुतक नाही.

कागाळ्या , लाथाळ्या,वैर, हेवेदावे, द्वेष, मत्सर,लावालाव्या ?

खरंच समाज एवढा अधःपतीत झाला ?

आणि हाच हिंदू धर्माला शाप ठरतो आहे का ?
असा समाज एकसंध राहणार तरी कसा?

आणि एकसंध समाज ठेवायचा म्हणजे तारेवरची कसरत ना ?

म्हणूनच बुध्दीमान माणसं परदेशात पळून चालली का ?
कुणाचा कुणाला कांहीं ही संबंध नको ?

कदाचित माझं लिखाण कांहीं जणांना एकतर्फी वाटेल ही.

पण अशा विचित्र समाजरचनेत खऱ्या माणसांचा जीव गुदमरणारच ना ?

आणि याचाच नेमका आणि अचूक फायदा विदेशी क्रूर आक्रमणकाऱयांनी घेतला.

परीणाम ?
आपला धर्म घटला?त्यांचा धर्म वाढला.
आपला भूभाग घटला,त्यांचा भूभाग वाढला.

आपले आदर्श ईश्वरी सिध्दांत मागे हटले ?
त्यांचे ⁉️ असुरी सिध्दांत त्यांनी गळचेपी करून , निर्दयपणे सत्याची सुध्दा हत्या करून पुढे दामटले.

मठ मंदिरे उध्वस्त केली.
सभ्यता संस्कृती नामशेष केली.

आणि तरीही आपल्या लाथाळ्या संपल्या नाहीतच.?

मग असा धर्म , संस्कृती नामशेष व्हायला किती वेळ लागेल ?

इजिप्त ची पुर्वीची संस्कृती लोप पावली , पार्शीयन लोप पावले.

हिंदुही स्वार्थ , भय याने मागे हटत गेला.प्रत्येक आघाड्यांवर सपशेल माघारी घेऊन सपशेल उताना पडला,पालथा पडला.
अजूनही मागे मागे च पळतो आहे.
पळा पळा पळा…
मागे लाथा लागेपर्यंत पळा…

काश्मीर सारखा ?

किती दिवस मागे पळणार ? किती दिवस मागे हटणार ?

पुरूषार्थ , ईश्वरी तेज, आत्मसन्मान,सत्व हरवलेला व विसरलेला नपुंसक समाज किती दिवस तग धरेल ?

आणि पुन्हा वर आपसातल्या लाथाळ्या ?
एखाद्यातलं फुटकळ कारणांच जीवघेणं वैर ?
आणि वर ? कर्तत्वशून्यता…

अरे
अस्तित्व शून्य होण्याची वेळ आली तरी ? एकमेकांच्या बोकांडी बसून एकमेकांना संपवण्याचे अजूनही क्रूर , कपटी डाव टाकताय ?

हे वागणं बरं नव्हं बाबांनो ? विचार करा.
मेलेल्या मनानं , हताश, उदास होऊन जगायचं सोडून द्या रे बाबांनो.

पराक्रमगाजवायचा तिथे शेपूट घालून पळायचं , अन् ? नको तिथे पुरूषार्थ गाजवायचा…?

भले बहाद्दर…?

तुमच्या भल्यासाठी एखादा धावत आला तर त्यालाही लाथा घालून हाकलून देतील असे लोक ?
अशीही क्रूर लोक समाजात असतील तर ?
त्या समाजांच भलं कसं होणारं ? आणि कोण कसा करणारं ?

बघा बाबांनो पटतय का ते ? पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून वाऱ्यावर ?

एकमेकावर प्रेम करा, असं मी म्हणणार नाही.एकमेकावर जीवापाड प्रेम करा,असं तर मुळीच म्हणणार नाही.
पण कमीत कमी एकमेकांचा द्वेष तरी करू नका.
एकमेकांमध्ये लाथाळ्या तरी करू नका.

कमीत कमी जो पुढे चाललायं त्याला सहकार्य करा अथवा नका करू,पण कमीत कमी त्याचे पाय तरी ओढू नका.
एखादा धर्म कार्य करीत असेल तर त्याला चौफेर संकटात गाठून , त्याला ढसढसा रडवू तरी नका.

एवढं तरी करा बाबांनो.

नाहीतर
एकमेकांच्या लाथाळ्या करण्यातचं उभं आयुष्य वेचा, अन् असेच तडफडून मरा.

तुमच्या नशीबातच विपरीत लिहीले असेल तर त्याला देव तरी काय करणार ?
एखादा देवदूत तुम्हाला तारायला आला तर ? पार त्याचेही तुकडे तुकडे करून त्यालाही तुम्ही मारून टाकाल ?

तुमचा, कृतघ्न समाजाचा भरवसा तरी कसा धरायचा ?

बघा…
सुधारलात तर संस्कृती वाचेल.
सुधारलात तर विश्व विजेता ही बनाल ?

अन्यथा ???
विनाशकाले विपरीत बुद्धी:
हेच खरं होईल.

शेवटी ज्याचं त्याचं नशीब, अन् ज्याचं त्याचं कर्म….
मी बापडा काय करणार ?? काय लिहीणार ??

औषध कडू असंत,पण गुणकारी असतं.
तसं माझं हे लिखाण कडू असेलही , पण गुणकारी नक्कीच आहे.

शेवटी इच्छा भगवंताची.

हरी ओम्
नमस्कार

🙏🙏🙏

Related Post

Translate »
error: Content is protected !!