Tue. Dec 30th, 2025

श्रीमंतीचे प्रदर्शन ?

Spread the love

*श्रीमंतीचे प्रदर्शन* *कशासाठी ❓*
✍️ २७३८

💰💰💰💰💰

*श्रीमंती…*
एक आनंददायी , स्वाभीमानी जीवन प्रणालीसाठी एक दैवीय वरदान आहे !
पण श्रीमंती सहजसाध्य नाही आणी भल्याभल्यांना श्रीमंतीचा मोह असतोच असतो !

पण ख-या श्रीमंतीसाठी माता महालक्ष्मीचे वरदान असणे अती आवश्यक असते !
माता महालक्ष्मीचे वरदान हीच खरी श्रीमंती !
आणि ही श्रीमंतीच खरी आनंददायी असते !

जीथे सुख शांती समाधान आनंद परोपकार असतो , जीथे पुण्यवंत व्यक्तींचा मानसन्मान व आदरभाव असतो तीच खरी श्रीमंती !

धन वैभव ऐश्वर्य सर्व सुखे म्हणजे श्रीमंती !
आणि मनाची श्रीमंती ही पण खरी श्रीमंतीच असते !

धनाने मोठा आणि मनाने भीकारी असेल तर अशी श्रीमंती काय कामाची ?

ख-या श्रीमंती मध्ये समाधान असते तर दिखाव्याच्या श्रीमंती मध्ये अशांती , वखवख असते !

सनातन हिंदू धर्मामध्ये श्रीमंत होण्यासाठी व माता महालक्ष्मीच्या कृपेसाठी अनेक उपाय , वृतवैकल्ये , मंत्र सांगितले आहेत !

श्रीमंती म्हणजेच खरे धन , याची प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यकता असतेच असते !
धना अभावी जीवन दु:खदायक व कष्टदायक असते !

धनवान व्यक्तिला मानसन्मान मिळतो तर धन नसणाराला मानसिक उपेक्षा सोसावी लागते !

प्रत्येक क्षेत्रात धन अत्यावश्यक असते !
पण धनातून जीवनात शांतता ही येते आणि उन्माद ही येतो ! आणि उन्मादातून अनेक प्रमाद ही घडतात !
सामाजिक उद्रेक , प्रमाद ही धनातून घडतात !

” *श्रीमंतीचे प्रदर्शन “*
हा एक समाजात नवीन प्रघात रूढ होतो आहे !
प्रत्येक क्षेत्रात श्रीमंतीचे प्रदर्शन !
कर्ज काढूनही श्रीमंतीचे प्रदर्शन कशासाठी ⁉️

*हे खरंच गरजेचे आहे का* ❓

लग्न समारंभात तर अशा उन्मादी श्रीमंतीच्या प्रर्दशानाची जणू भयंकर जीवघेणी स्पर्धाच लागलेली दिसते !
जे अनावश्यक खर्च व नसती उठाठेव या सदरात बसते !
अश्याच प्रकारे अनेक संभारंभातही अशा अनावश्यक श्रीमंतीच्या चढाओढीची व स्पर्धांची जणू रेलचेलच दिसते !

अशावेळी अनावश्यक खर्च तर होतोच होतो , पण अन्नाची ही भयंकर नासाडी होते !

*साधी राहणी उच्च* *विचारसरणी*
ही बाब सध्या दुर्मिळ दिसते आहे !
ठीक आहे !
*कालाय तस्मै नमः*
प्रमाणे हे एकवेळ योग्य वाटते ही पण तरीही अनावश्यक खर्च व फुजूल प्रदर्शन या विषयातच ही बाब बसते !

ख-या श्रीमंती मधून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात , हे सध्या बरेच जण सप्रमाण सिद्ध करूनही दाखवत आहेत !

पण ब-याच वेळा असेही दिसते की , परोपकार ही हल्लीच्या काळात एक भयंकर शाप ठरतो आहे !
आणि हा आज फार मोठा अनुत्तरित प्रश्न आहे ! ⁉️

कारण परोपकार करायला जावं तरी अंगलट येतंय !
एखाद्याला आधार दिला , सहकार्य केले तरी आज बरीच माणसं कृतज्ञ रहायचं सोडून कृतघ्न होताना मी बघितली आहेत !

त्यामुळेच की काय एखाद्याला आर्थिक सहकार्य करणे किंवा आर्थिक आधार देणे ही
उत्तरोत्तर भयावह वाटते आहे !

कारण ज्याला आधार दिला , ज्याला सहकार्य केले तोच आपल्या जीवावर उठतो आहे तर याला उत्तर काय ❓आणि समाजात आज असे भयावह प्रकार ब-याच ठिकाणी चालू आहेत !

त्यामुळे समाजात नेमके वागायचे कसे ?
हा महत्वपूर्ण प्रसंग निर्माण होतो आहे !

म्हणूनच समाजात दिखावा , वरपांगीपणा ,
चांगुलपणाचे नाटक , श्रीमंतीचे प्रदर्शन ,
अशा गोष्टीही वेगाने फोफावत आहेत !

आणि यातूनच सामाजिक सामुहीक नैराश्य व उदासिनता ही वाढत आहे !

मनामनाची घालमेल , कोंडी , एकाकीपण वाढते आहे !

मन तुटतं आहेत !
माणसं मनाने एकमेकासून दूर जात आहेत !
शुद्ध प्रेम , आत्मीयता , आपुलकी , जिव्हाळा लोप पावतो आहे !

खरंच हे कशाचे द्योतक आहे ?
सामाजिक , आर्थिक प्रगतिचे की सामाजिक अंध:पचनाचे ?
उत्तर काय आहे ??

म्हणूनच श्रीमंती वरदान नव्हे तर एक शाप ठरतो आहे !

*हे खरंच गरजेचे आहे का* ❓

या सर्वांवर विजय मिळवून खरे सुखी जीवन जगायचे असेल तर ,
संपूर्ण मानवीसमुहाला
एकच उत्तर आहे ,
ईश्वरी चरणावर संपूर्ण समर्पण व आदर्श वैश्विक सनातन हिंदू संस्कृती चा स्विकार !

कारण ईश्वरी प्रेम व समर्पण हे अहंकार शून्य बनवते तर सनातन संस्कृती मानवी जीवनात पूर्णत्व शिकवते !

ज्याच्या पासून संपूर्ण जग हे हजारो कोस दूर भरकटते आहे !

बघा , पटतंय का !
पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून वा-यावर !

*जय श्रीकृष्ण !!*

🚩🚩🚩🚩🚩

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!