Mon. Oct 27th, 2025
Spread the love

*श्रीमंतीचे आनंदी जीवन*
✍️ २७१५

💎💰💎💰💎

श्रीमंत , गर्भश्रीमंत होऊन, मस्त, आनंदी जीवन जगावं असं सगळ्यांनाचं वाटत असतं.

पण त्यासाठी नशीब जोरात असावं लागतं.
आणि आई महालक्ष्मीच्या खडतर साधनेने आपले नशीब, संपूर्ण जीवन ही बदलता येते.

श्रीमंतीसाठी पैसा,धन हवं.

त्यासाठी आई जगदंबेची, माता महालक्ष्मीची कृपा व्हावी लागते.

लक्ष्मीप्राप्ती झाली की अनायासेच धन, वैभव,ऐश्वर्य चालून येतं.

राजयोग ही चालून येतात.

बंगले, गाड्या,नोकर,चाकर यांची रेलचेल होते.

एक सर्वसंपन्न सुखी जीवन.

आणि आई जगदंबेचा दृष्टांत झाला , लक्ष्मीपती भगवंत अर्थात विष्णुचा दृष्टांत झाला की…
संपूर्ण जीवनच उजळून निघते.

साधारणतः
लक्ष्मी कृपा झाली की
ऐश्वर्य , श्रीमंती, वैभव यायला सुरुवात होते.
हात लावील तिथे सोने व्हायला लागते.
उत्तुंग यशाची शिखरे काबीज होऊ लागतात.
चौफेर यशाचे रस्ते मोकळे व्हायला लागतात.

पण ब-याच वेळा लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी कृपा झाली की असा मनुष्य साधारणतः जमिनीवरून हवेत उडायला लागतो.
दुस-यांना तुच्छ समजायला लागतो.

अशा व्यक्तिसाठी समाजात मान,मरातब,संन्मान हाच महत्वाचा भाग होऊन बसतो.
भोगविलासी जीवन वाढते.

अशावेळी बरेचदा असे घडते की ,मनुष्य जमिनीवरील आपले स्थान विसरतो.व अहंकाराच्या गर्तेत सापडून अनायासे विनाशाकडे व चुकीच्या रस्त्याकडे झुकला जातो.

म्हणूनच प्रसंगावधान राखुन मान , संन्मान,यश,किर्ती, वैभव,ऐश्वर्याने हुरळून न जाता ,पुर्वीचे दुखा:चे , कष्टदायक भयंकर जीवन न विसरता ऐश्वर्यात असुनही इतरांना तुच्छ न समजता ….

साधे राहूनही, भाजी भाकरी खाऊनही आणि साध्या झोपडीत राहून सुद्धा सदैव उच्च विचाराने व निरअहंकारपणे साधे जीवन जगुन , इतरांना आनंद, समाधान देणारी माणसेही आहेत….

पण विरळा.

उच्च कोटिच्या सिध्दीमुळे कांहीं व्यक्तिस ऐश्वर्य तर मिळतेच, देवीदेवतांचा सहवास लाभुनही अशा व्यक्ती निरपेक्ष पणे समाजहितासाठी , देशहितासाठी, धर्म रक्षणाच्या कार्यासाठी निरंतर झटत राहतात.

साधे राहूनही, निगर्वी होऊन, समाज हीत साधणे , हेच खरे ईश्वराधिष्ठीत जीवन होय.

अशी माणसे विरळा असतातच.

पण आपल्या श्रेष्ठ आचरणाने इतरांनाही सदैव प्रेरीत करत असतात.

दु:खितांचे अश्रु पुसणे , पशुपक्षांवर, भगवंताच्या सृष्टीवर निस्सीम प्रेम करने या ख-या जीवनातच अशी माणसे रमतात.

अशा व्यक्तींना झोपडी असो अथवा राजमहाल, दोन्ही एकसमानच असते.

!! जय जय रामकृष्णहरी !!

!! जय माता महालक्ष्मी की !!
!! विष्णू भगवान की जय !!

!! जय माता बगलामुखी की !!
!! जय माता सिध्दीदात्री की !!

!! सद्गुरू आण्णा माऊली की जय !!

🙏🙏🙏🙏🙏

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!