Mon. Feb 17th, 2025
Spread the love

बालपण!!
✍️ २५९९

माझ्या लहानपणी
जवळ पैसा नव्हता
खायला अन्नही नसायचं
तरीही समाधान होतं.

कारण जवळ आण्णा सारखी देवतूल्य माणसं होती.
स्वतः पेक्षा दूस-यावर प्रेम करायला शिकवणारी ईश्वर स्वरूप माणसं. मोठ्या मनाची माणसं.
मायेची पाखर घालणारी ती माणसं कुठं शोधायची?

हरवलं ते बालपण.

आता भरभरून पैसा आला.
लाखो, करोडोनं.
पण समाधान संपलं.
कारण आता जवळपास माझ्या आण्णा सारखी, मायेची पाखर घालणारी माणसंच राहिली नाहीत.
सगळा पैशाचा बाजार.

माझं काय, इतरांच काय.
समाजातलं देवपणचं हरवलं. अन् समाजाचं गणितचं राक्षसी झालं.
सगळं गणितचं पार बिघडून गेलं.

घोर कलियुगाचं सारं गणितचं पारं बिघडलं.
सारं सारं विपरीत घडलं.
सामाजिक गणितचं पार आक्रीत ठरलं.

खरंच मित्रांनो
जगबुडी जवळ आली?

होय
जगबुडी अगदी जवळ आली.
पार उंबरठ्यावर आली.

कशी?
दिसेलचं तुम्हाला.

सृष्टी पण नवसृजनासाठी आसुसली.

हरी बोल.

विनोदकुमार महाजन

Related Post

Translate »
error: Content is protected !!