आत्म्याचे बोल !!!
देवाला ओळखणं ?
फार कठीण आहे.
त्याच्या जवळ जाणं ?
आणखी कठीण आहे.
त्याचं दर्शन होणं ?
हे तर फारच महाकठीण आहे.
( तो तुमच्याजवळ कोणत्याही रूपात येऊन तुम्हाला दर्शनही देऊ शकतो.
अगदी कुत्र्याच्या , मांजराच्या , चिमणीच्या , कावळ्याच्या रूपातही येऊ शकतो.वेड्याच्या , भिका-याच्या रूपातही येऊ शकतो.
पण ? तुमचं कर्मच झोपलेलं असल्यामुळे , तो विविध रूपात तुमच्या जवळ येऊनही तुम्ही त्याला ओळखु शकत नाही.
अहो , एवढंच कशाला ?
अनेक माणसांतही देव असतो.अन् ? अनेक माणसांतही देवत्व असतं.
पण ?
कर्मदरीद्री माणसं अशा देवत्वतुल्य माणसांना तरी काय ओळखणार ?
त्यासाठी ? दिव्यत्वचं मिळवावं लागतं )
पण ? सद्गुरू कृपा असेल तर ?
सगळचं साध्य होतं.
मग कठीण कांहीच उरत नाही.
माझ्या आण्णांच्या परमकृपेने मला सगळचं प्राप्त झालं.
दिव्यत्वही मिळाल.
दिव्य दृष्टीही मिळाली.
या दिव्यत्वातुनच सनातन धर्माचं उत्तुंग वैश्विक कार्य ही आरंभ झालं.
हरी बोल प्यारे.
विनोदकुमार महाजन
( अमृतसागरानंद )