Thu. Nov 21st, 2024

राजगुरू नगरमधील हिंदुत्ववादी संघटनांनी काढला जोशपूर्ण निषेध मोर्चा

Spread the love

*Press Note:*

खेड, राजगुरूनगर. दि- 30 जून: महाराष्ट मधील अमरावतीचे उमेश कोल्हे यांची २१ जूनला व राजस्थानातील उदयपुर येथे २८ जूनला कन्हैया लाल यांची जिहादी मानसिकतेच्या धर्मांधाकडून आतंकवादी पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली, त्याचा विश्व हिंदू परिषद-बजरंग दल राजगुरुनगर नेतृत्वात समस्त हिंदू समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. सदर निषेध मोर्चा हा एस टी स्टँड राजगुरुनगर ते डॉ हेडगेवार चौक पाण्याची टाकी पर्यंत काढण्यात आला.या वेळी मोर्चात भविष्यात अश्या घटना घडल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार झाला.
मोर्चामध्ये राजगुरुनगर मधील सर्व पक्षीय अधिकारी उपस्थित होते आणि शेकडोंच्या संख्येने बजरंगी उपस्थित होते.
प्रतीक दौंडकर यांनी सूत्रसंचलन केले.
अशोकजी यलमार यांनी सर्व हिंदू समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.संतोष जी खामकर यांनी निषेध मोर्चाचा समारोप केला.

वृत्त संकलन : – गिरीश चावरे, राजगुरू नगर

Related Post

Translate »
error: Content is protected !!