जय श्रीराम
*जुन्नर मधून येणाऱ्या गोमांसाचा बनला अड्डा राजगुरूनगर*
दि 19/06/22 रोजी एक महिला जुन्नर वरून गोमांस घेऊन येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. माहितीप्रमाणे ती महिला तेलेआळी राजगुरूनगर येथे दोन चॉकलेटी रंगाच्या बॅगेत 40-50 किलो गोमांस. 1-1 किलोच्या काळ्या पिशव्या करून ते गोमांस विक्री करत असताना गोरक्षकांनी दिसली. लगेचच कंट्रोल रूम ला 112 वर कॅल केला असता तात्काळ पोलीस मदत पोहोचली.दरम्यान महिलेला विचारपुस केली असता तायरा हारून कुरेशी असे नाव सांगितले पोलीस आल्याची चाहूल लागताच तिचा 16 वर्षाचा मुलगा सादिक हारून कुरेशी तिथून पळून गेला.गोमांस विक्री करण्याची कबुली दिल्यानन्तर पो.कॉ. कोठावळे व सहा.पो. फौ. कारभळ खेड पोलीस टीम ने मा.पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या गोमांस असल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे महिलेस अटक करून गोमांस ताब्यात घेतले .
महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा ५,५(अ),९व भारतीय प्राणी संरक्षण कायदा ११ आणि नुसार कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोरक्षा प्रमुख दीपक गावडे व अतुल ( बाली )कुलकर्णी अन्य गोरक्षक , निखिल थिगळे,केतन थिगळे, अनिकेत वाळुंज, अक्षय कारले,राहुल डावखर,मयूर सावंत, गौरव दौंडकर, योगीराज करवंदे, अक्षय पऱ्हाड यांनी सहभाग घेतला.
आपला नम्र
विश्व् हिंदू परिषद बजरंग दल खेड प्रखंड.
वृत्त संकलन :- गिरीश चावरे,राजगुरू नगर