
*माझे मायबाप ?* *बार्शीचे लक्ष्मी* *भगवंत…!!!*
✍️ २९०१
*विनोदकुमार महाजन*
👆✅🕉️🙏
माझे मायबाप ?
बार्शीचे लक्ष्मी भगवंत !
होय…
आपले जन्मोजन्मीचे खरे मायबाप कोण ?
साक्षात विष्णू आणि लक्ष्मी !
पंढरपूरचा पांडुरंग आणि माता रूक्मिणी !
आळंदीचा ज्ञानराज !
कोल्हापूरची माता महालक्ष्मी !
जन्मोजन्मी आपली काळजी करणारी , आपली चींता वाहणारी , आपले पावलोपावली अश्रू पुसणारी ही खरी दैवत…
हाडामासाच्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती…
प्रत्येक सुखदुःखात धावून येणारी , वात्सल्याने सतत काळजी करणारी आपली खरी नाती ?
हीच होत…
घोर कलियुगात , स्वार्थाच्या बाजारात , ज्याला ही खरी नाती सापडली तो खरा ?
राजा…
त्रिलोकीचा राजा…
माझ्या बार्शीचे लक्ष्मी भगवंत सुध्दा आमच्या बार्शीकरांचे खरे मायबाप !
बार्शी नगरी म्हणजे परम वैभवाचे भंडार !
सुख , शांती , समाधान , आनंदाचे परम माहेर घर म्हणजे माझ्या आई बापाची , लक्ष्मी भगवंताची , परम पावन नगरी बार्शी !
जगाच्या कोलाहलातून सुटुन , एक शांत , सुखी , समाधानी , आनंदी व यशस्वी जीवन जगायचे असेल तर बार्शी नगरीमध्ये यावे !
कोल्हापूरची माता महालक्ष्मी इथेही वास करते ! भगवंताबरोबर…अगदी आनंदाने… आणि आपल्या ख-या भक्तांची , लेकराची , पावलोपावली काळजी करते , याची दिव्य अनुभूती आपणास सदैव येत राहते !
जगातलं सगळं राज ऐश्वर्य सोडून बार्शी नगरीमध्ये जो येतो त्याला इथली एक साधी झोपडी सुध्दा परम वैभवापर्यंत घेऊन जाते.
माझे सद्गुरू आण्णा व माझी माऊली गोजरमायच्या संगतीतील बार्शी नगरीतील परम वैभवशाली बालपणाच्या दिवसाचे वर्णन शब्दाने काय करणार ?
साक्षात स्वर्गीय दिव्य अनुभूती म्हणजे बार्शी नगरीचे भाग्यदायी बार्शीचे वास्तव्य…
अंबरीश राजाला वरदान देणारा माझा भगवंत इथेच लक्ष्मी सह रात्रंदिवस वास करतो.
त्या मायबापाचा सहवास म्हणजे ?
नितदिन स्वर्गीय सुखाची प्राप्ती…
अंबरीश वरद श्री लक्ष्मी भगवंत की जय हो…
🙏🙏🕉️🌹
