
*परकाया प्रवेश* ( एक उच्च सिध्दी )
✍️ २७१२
🕉🕉🕉🕉🕉
परकाया प्रवेश नावाची एक सिध्दि असते.
दुस-याच्या मनात , आत्म्यात प्रवेश करून त्याचे दु:ख , पिडा, यातना आपल्याला तपासता येतात.
त्याचं सुखदुःख एका जागी बसुनही बघता येत.
आणी त्याला अदृश्य रुपाने मानसिक आधार देऊन खंबीर ही बनवता येत.
आणी वाईट वेळेशी , संकटाशी सामना करण्याची अदृश्य शक्ति त्याच्या मध्ये भरता येते.
आणी अदृश्य रूपानेच असा संबंधित व्यक्ति परकाया प्रवेश करून मार्गदर्शन करणाराकडे आपोआपच आकर्षित होतो.
व दोघांचे अतूट दैवीय नाते बनते.
फक्त अट एकच आहे की , ज्याच्या मध्ये परकाया प्रवेश करावयाचा आहे , त्याचे मन पवित्र असावे लागते.
निस्सीम ईश्वर भक्ति हा सर्वश्रेष्ठ निकष असतो.
दूरचे ऐकू येणे , कोण , कुठे, काय चर्चा करतो आहे हे समजने , आपल्या विरुद्ध कोणी कांही षड्यंत्र करत असेल तर तेही समजते.व त्यावरही अदृश्य रूपाने उपाय योजना करता येते.
त्यामुळे कुणाला बोलण्याची , कुणाशी संवाद साधण्याची अथवा कुणामध्ये मिसळून सुखदुःख जाणून घेण्याची गरजचं लागतं नाही.
अदृश्य व्यासपीठ असते हे.
ही एक उच्च कोटिची सिध्दी आहे.व सनातन धर्मामध्ये अशा अनेक सिध्दींचा उल्लेख आढळतो.
ज्याचा जन्मच सिध्दी दात्री दिवशीचा आहे त्याला या सिध्दी आई महालक्ष्मीच्या कृपेने आपोआपच प्राप्त होतात.
कठोर तप:श्चर्येने ही अनेक उच्च सिध्दि प्राप्त करता येतात.
पुर्व जन्मीचा पुण्यसंचय ही अनेक असाध्य गोष्टी साध्य करून देतो.
ऐश्वर्य प्राप्ति , शत्रु पिडा नाश , एखाद्याचे अनेक प्रश्न अदृश्य रूपाने व त्याच्या परस्पर सोडवणे , हाही या सिध्दिचाच भाग आहे.
गुरूकृपेमुळे अनेक अशक्य गोष्टीही शक्य होत असतातच हा माझा स्वानुभव आहे.
अनुभव व दिव्य अनुभूति यासाठी आज्ञाचक्र जागृती चा यासाठी जास्त फायदा होतो.
कैलाश पर्वत , गिरनार पर्वत ही उच्च अनुभूतीची श्रेष्ठ आध्यात्मिक स्थाने आहेत.
बरोबर उच्च कोटीचा भावही महत्वाचा आहे.
मनाची व आत्म्याची शुध्दी , निस्सीम भाव व अतूट श्रध्दा , विश्वास व उच्च कोटीचे प्रेम , गुरूचरणी संपूर्ण समर्पण हेच उच्च अनुभूतीचे व परम कल्याणाचे साधन आहे.
।। सद्गुरू कृपा सर्वांवर होवो ।।
।। अवधूत चींतन श्री गुरूदेव दत्त ।।
🙏🕉🙏🕉🙏
*विनोदकुमार महाजन*
