
एक चमत्कार झाला…
( पुनर्जन्म ??)
सगळं घरदार सुखी,आनंदी व्हावं,
” घरात घुसलेली अवदसा ” कायमची घरातुन निघून जावी म्हणून त्यानं जंगजंग पछाडले.अनेक ट्रैप त्यानं वापरले.रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
पण दुर्देव…
त्या भयावह ट्रैपमध्ये त्यालाच अडकवलं.
बदनाम,बरबाद केलं.
कुणी ? कशासाठी ?
तो संपला.
पूर्णपणे संपला.
आयुष्यातून उठला.
नामशेष झाला.
अस्तित्व शून्य आयुष्य बनले त्याचे.
शूध्द हरपली.
दिवा विझला.
औदुंबराचं झाड पार वठून गेलं.
निष्प्राण हाडाचा ढीग लागला.
अस्तित्व संपले…
आणि एक दिवस दैवी चमत्कार झाला.
नव्हत्याचं होतं झालं.
विझलेला दिवा पुन्हा पेटला.
वठलेल्या औदुंबराला पालवी फुटली.
हाडाच्या ढिगा-यातून चैतन्य फुललं.
फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्मला.
कशासाठी ? कुणासाठी ?
देव अन् दैवच जाणे हा ईश्वराचा चमत्कार कसा व का घडला.?
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
विनोदकुमार महाजन
