कोल्हापूरची महालक्ष्मी
✍️ २७०६
👏👏👏👏👏
कोल्हापूरची आई जगद् अंबा ज्याला स्वप्नात येऊन साक्षात बोलतै , काळजी करूं नको म्हणते ,त्याचे अश्रू पुसते , त्याला घरी रहायला आल्याचे वचन देते , गाईच्या रूपात येऊन स्तनपान करते , डोक्यावरून मायेने हात फिरवते , ज्याचा जन्म ही दस-याच्या नवमिचा , सिध्दीदात्रीचा आहे , अशा तिच्या लेकराला कोण हरवू शकणार ?
आणी त्या घराची आश्चर्यकारक पध्दतीने भरभराट होते , अशा तिच्या लेकराला कोण हरवू शकणार ?
हे थोतांड , भ्रम , भास , दिशाभूल अंधश्रद्धा नव्हे तर वास्तव आहे.
एखाद्याचे संपूर्ण जीवन ही चमत्कार झाल्यासारखे आश्चर्यकारक पध्दतीने बदलून जाते , अशा अद्भूत अनुभूतीवर कोण अविश्वास दाखवणार ?
ज्यावेळी माणसं भयंकर द्वेष करतात , रडवतात, नरक यातना देतात , त्याचवेळी ईश्वर मात्र आपल्यावर निस्सीम प्रेम करत असतो.आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो.
त्यामुळे संकटात अथवा एकाकी लढत असताना जीवनात हार कधिही मानू नये.
ईश्वरी शक्ती सतत आपल्या सोबतच असते.
तशी अनुभूती पण देत असते.
म्हणून सत्याचा व ईश्वर निर्मित धर्माचा अंतिम विजय हा स्वतः ईश्वर च करत असतो.
जय माँ
जय माई
जय माँ महालक्ष्मी
जय माई बगलामुखी
🙏🙏🙏🙏🙏
विनोदकुमार महाजन