एखाद्याच्या सांगण्यावरून आपले मत बनवू नका. कारण ते खोटं ही असू शकतं.
आणी त्यामुळे एखाद्या निष्पाप जीवाला त्रासही होऊ शकतो.
त्यामुळे संपूर्ण खात्री पटल्याशिवाय, शहानिशा झाल्याशिवाय व खरे खोटे समजल्याशिवाय एखाद्या विषयी आपली मते बनवू नका. ती मते भविष्यात चुकीची पण ठरू शकतात.
ब-याच वेळा अफवांवर व चुकीच्या माहितीवर आधारित आपली मते बनविण्याची व त्यावरच ठाम राहण्याची ब-याच जणांना सवय असते.
त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊन, अनेक जटिल समस्या निर्माण होतात.
विनोदकुमार महाजन