Tue. Dec 3rd, 2024
Spread the love

*बार्शीचा माझा भगवंत !!*
✍️ २४९४

*विनोदकुमार महाजन*
पत्रकार

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

बार्शी….
एक साधारण लोकसंख्या असणार ,कमी पर्जन्यमान असणारं , दुष्काळी पट्यातील तालुक्याच गांव.
बार्शीची लोक पण साधी , सरळ , सगळ्यावर भरभरून प्रेम करणारी ,सगळ्यांना आधार देणारी , दुस-याच्या सुखदू:खात धावून जाणारी , सभ्य माणसं.
सभ्य माणसांचा गाव म्हणजे बार्शी .
बार्शीची आडत व्यापार लाईन पण मोठी.

बार्शी तस विशेष प्रसिद्ध आहे ते भगवंतासाठी.
इथे लक्ष्मीसह साक्षात भगवंताचे आजही वास्तव्य आहे.
अशी बार्शीकरांची विशेष श्रद्धा आहे.
अंबरीश राजा , दुर्वास मुनी व भगवंताची इथे विशेष कथा सांगितली जाते.
अंबरीश राजाच्या रक्षणासाठी साक्षात भगवंत इथे प्रकट झाले व आजही त्यांचे इथेच वास्तव्य आहे , असे इथले लोक समजतात.

माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांसह बार्शीला शिकायला होतो तेंव्हाचा तो काळ , त्या आठवणी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा आहेत.
साक्षात स्वर्ग माझ्याजवळ चोवीस तास नांदत होता. सगळी स्वर्गीय सुखही इथे फिकी वाटतात , एवढं छान वातावरण , छान गांव .

आनंदाचे डोही , आनंद तरंग.

आजही त्या बालपणाच्या आठवणी जशाच्या तशा ताज्या तवान्या आहेत.

माझे आण्णा भगवंतापुढे बराच वेळ उभा राहून प्रार्थना करायचे.
त्यावेळी मी माझ्या आण्णांना सहज विचारलं ,
” आण्णा , एवढा वेळ भगवंताकडे काय मागता ? ”
त्यावेळी माझे सद्गुरू आण्णा उद्गारले ,
” अरे बाळा मी माझ्यासाठी थोडचं देवाकडे मागतो आहे. मी तुझ्या सगळ्या सुखासाठी भगवंताकडे साकडं घालतो
आहे ”
धन्य ते स्वर्गीय ईश्वरी प्रेम.
असे पवित्र ,भव्यदिव्य ,उदात्त , उत्तुंग , निस्वार्थ प्रेम आता कुठे शोधावे ? कुठे मिळेल ?

अजूनही असं वाटतं की , पुन्हा एकदा माझ्या भगवंताच्या बार्शी नगरीत येऊन कायमचं स्थायीक व्हावं.

नको ते पुणे , नको मुंबई ,
माझ्या भगवंताची बार्शी बरी.
नको पंढरपूर , नको आळंदी ,
माझ्या भगवंताची बार्शी बरी.
नको परदेश , नको देशविदेश ,
माझ्या भगवंताची बार्शी बरी.

माझी बार्शी ,फळावी फुलावी .
आनंदाची इथे नित्य नवी बहार यावी.

भगवंता , माझ्या बार्शी शहरातील व बार्शी तालुक्यातील तमाम लोकांना सुखी – समाधानी – आनंदी ठेव.
हीच तवचरणी प्रार्थना.

अंबरीश वरद श्री भगवान की जय हो .

८३२९८९४१०६

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Related Post

Translate »
error: Content is protected !!