आनंदान नाचावं,आनंदान गावं
———————————-
आनंदान नाचावं, आनंदान गावं
आनंदान हसावं,आनंदान खेळावं….
हसत खेळत जीवन छान छान जगावं
मस्त जगावं
कलंदर होऊन जगावर प्रेम करावं
स्वकीय, आप्तेष्ट, समाज,मित्र, नातेवाईक सगळ्यावर भरभरून प्रेम करावं
पशुपक्षांशीही मस्त नात जोडावं
पशुपक्षांचही दु:ख समजावून घ्याव
त्यांच्याही सुखदु:खात सहभागी व्हावं
प्रत्येकाच्या दु:खात मायेची फूंकर घालावी
हसता खेळता सगळ्यांच चैतन्य जागवावं
आनंदाच्या जगात सगळ्यांना हरखून टाकावं
माझ तुझ विसरावं
सगळ्या मित्रावरही खरखुर,स्वच्छ, निष्कपट,निर्मळ,ईश्वरी भरभरून प्रेम करावं
सगळ्यांच जीवन मस्त बनवावं
सगळ्यांच्या जीवनात सुखाची बहार यावी म्हणून ईश्वरालाही साकड घालावं
मस्त हसत खेळत जगावं
आनंदान जगावं
पशुपक्षासारख आनंदान बागडावं
निष्पाप, निरागस लहान मुलासारख मन ठेवून, आनंदी होऊन सगळ्यावर भरभरून प्रेम करावं
पण…पण….पण…???
प्रेमाच्या बदल्यात धोका,कपट,स्वार्थ, अहंकार,मोह,मत्सर,द्वेष, निंदा,विश्वासघात मिळत असेल तर ???
तर ???
एका फटक्यात सगळ्यांशी नात तोडावं
भगवंताशी अनुसंधान साधावं
ईश्वराला शरण जावं
ईश्वराशी बोलावं
ईश्वरी आनंदात मदमस्त होऊन,धूंद होऊन,
मस्त मजेत नाचावं,गावं,हसावं, खेळावं
ईश्वराशी संवाद साधता साधता
एक दिवस स्वतः च ईश्वरस्वरूप होऊन जावं
स्वतःच्याच धुंदीत, तंत्रीत,समाधीत,ध्यानात मस्त मस्त मजेत जगावं
मायावी जगाशी नातं तोडून
साकार ब्रम्हातुन निराकारात रमावं
आणी…
एक दिवस निराकाराशी एकरूप होऊन जावं
पंचमहाभूतांचा हा नाशवंत देह
याचा एक दिवस अंत होणार आहे
याचही भान ठेवावं
म्हणूनच देहाचाही मोह सोडून
सुखदुःखाच्या पलिकड जावूनं
साकार ब्रम्हाशी नात जोडत जोडत
स्वतः ही ब्रम्ह होऊन जावं
साकारातुन निराकारात जावं
अन्….
स्वतः ही निराकार ब्रम्ह होऊन जावं
सुखदुःखाच्या ही पलीकड जावून
मनुष्य देहाच कल्याण करावं
हसत खेळत आयुष्य जगावं
हसत खेळत आपलं आतलं
चैतन्य जागवावं
आत्मोध्दार साधून दयाळू प्रभूला
विश्वोध्दाराचं साकडं घालावं
मस्त कलंदर बनून जगावं
हरी ओम्
—————————
विनोदकुमार महाजन