
*आई ….*
*विनोदकुमार महाजन*
महालक्ष्मी माते…🙏
सुख असू दे अथवा दुःख
श्रीमंती असू दे अथवा गरीबी
राजमहल असू दे अथवा झोपडी
माझी आई होऊन
जन्मोजन्मी माझ्या सोबतच रहा
निष्पाप प्रेम करत रहा.
माझ्या *आण्णांनी* तुझी प्राप्ती मला करून दिली आहे…
जन्मोजन्मी साठी…
मनुष्य जातीचा काय भरवसा ?
थोडे वाईट दिवस आले , गरीबी आली तर ❓⁉️घात करतील…साथ सोडतील….
दिव्य प्रेम करूनही जीवनभरासाठी ढसढसा रडवतील..
पण तू तर
सगळ्यांच्या पलीकडची माझी आई आहेस…
जगद् अंबा आहेस..
आई…$$$ अंबे…
जवळ घे….
मला तू दिलेले वचन
कधीच मोडणार नाहीस…
जय अंबे जगदंबे
🙏🕉️🚩🩷🌹
