Sat. Apr 11th, 2026

प्रेम कसे असावे

Spread the love

*प्रेम असे करावे…*
✍️ २८२७

*विनोदकुमार महाजन*

🌹🌹🌹🌹

प्रेम
असे करावे की
प्रेमासाठी वेडेपिसे व्हावे
प्रेम
असे करावे की
प्रेमात सर्वस्व झोकून द्यावे
प्रेम
असे करावे की
उभे आयुष्यच प्रेमासाठी वेचत रहावे
प्रेम
गुलाबासारखे सुंदर असावे
गुलाबासारखे सुगंधी पण असावे

प्रेम
असे करावे की
जन्मोजन्मी सोबतच रहावे
जन्मोजन्मी एकमेकांना शोधत फिरावे
तो देह सोडून गेला तरी जन्मोजन्मी त्याला शोधत रहावे
आणी त्याच्या पुन्हा भेटीसाठी भगवंतालाही साकडे घालावे

प्रेम
राम हनुमानासारखे असावे
कृष्ण अर्जुनासारखे असावे
राधा कृष्णासारखे असावे
मीरा कृष्णासारखे असावे
रामदास स्वामी कल्याण स्वामी सारखे असावे
आणी
आण्णा बापू सारखे ही असावे

प्रेम शुद्ध असावे
पवित्र असावे
निष्कपट , निस्वार्थी असावे नितल असावे तरल असावे
प्रेमात आर्तता असावी
प्रेमासाठी व्याकूळ होऊन जावे

मोहमाया , धनदौलत ही त्यापुढे फिके दिसावे
प्रेम असे असावे
जन्मोजन्मी सोबत राहण्याचे त्यात पावित्र्य असावे

जन्मोजन्मी टिकणारे हेच खरे प्रेम असते
मोह मायेच्या पलीकडचे खरे प्रेम असते
म्हणूनच त्याला अमृत म्हणतात
प्रेमामृत

प्रेमासाठी तहान भूक विसरून जावे
स्वतः चे अस्तित्व ही विसरून जावे

प्रेम करावे तर असे करावे
प्रेमासाठी अगदी वेडेपिसे व्हावे

गुरू शिष्य आणी
भक्त भगवंतासारखे प्रेम असावे

*जय राधेकृष्ण*

🌹🌹🌹🩷

Related Post

Translate »
error: Content is protected !!