
*ब्रम्ह संकट…* ???
✍️ २८९६
जगात कांहीं माणसं अशी ही असतात की , त्यांच्यावर जीवापाड प्रेम करूनही कांहीं उपयोग होत नाही , त्यांचा विरोध करूनही उपयोग होत नाही आणी मौन आणी शांत बसुनही उपयोग होत नाही.
आणी त्यांना कितीही समजावून घेतले तरीही उपयोग होत नाही.
सगळंच आणी नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी.
मग अशा माणसांपाशी रहायचं कसं आणी जगायचं तरी कसं ?
आणी अशा लोकांचं कल्याण तरी कसं काय करणार ?
अशा लोकांना खरं खोटं ही कळत नाही , चांगल वाईट ही कळत नाही.
आणी दुसऱ्याच ऐकण्याचीही अशा लोकांची तयारी ही नसते.
स्वतःच खोटं जरी असलं तरी स्वतःचच खरं मानायला लावणारे असे लोकं म्हणजे ?
कुणावर विश्वास ही अशी लोकं ठेवत नाहीत आणी ब्रम्ह देव जरी स्वतः प्रगटला तरी त्यालाही अशी लोकं पळवून लावतील .
अशांच्या तावडीत एखादा संत सज्जन सापडला तर ? त्याची ही पळता भुई थोडी होईल.अशांच्या संगतीत रहायचं म्हणजे ? चोवीस तास डोकं गरगरायचं काम.
तेज पाणी का बहाव ?
यातून बाहेर पडायचं कसं ?
रात्रंदिवस जीव आणी श्वास गुदमरणार ना ?
असंगाशी संग प्राणाशी संकट .
टोकाची हेकेखोर माणसं.
स्वतः श्रीकृष्ण एकनाथ महाराज यांचेकडे श्रीखंड्या बनून पाणी वहात होता.
आणी ?
हरी पंडित ?
दररोज भांडायचा.
भांडखोर माणसांना भांडणासाठी कांहीच कारण लागत नाही.
आडदांड.आडमुठे.
ब्रम्ह संकट….?
जय हरी विठ्ठल
*विनोदकुमार महाजन*
