Sat. Apr 11th, 2026

चला प्रकाशाकडे

Spread the love

*सुर्य एक… सुर्य किरणे* *अनेक…!!!*
✍️ २८१८

*विनोदकुमार महाजन*

🌞🌞🌞🌞

सुर्य एक सुर्य किरणे अनेक.
सुर्य प्रकाशमान सुर्य किरणे प्रकाशमान.

ईश्वर एक ईश्वराची सगळी सजीव सृष्टी एक.
ईश्वर प्रकाशमान आपण ईश्वराची सगळी लेकरे प्रकाशमान.

संपूर्ण ब्रम्हांड प्रकाशन
संपूर्ण ब्रम्हांडीय शक्ती प्रकाशमान.

सो अहम् प्रकाशन
प्रत्येक सजीवांच्या आतील अमर आत्मतत्त्व प्रकाशमान.

ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म प्रकाशमान
संपूर्ण सनातन सृष्टी प्रकाशन.

पिंडी ते ब्रम्हांडी प्रकाशमान
संपूर्ण पंचमहाभूते चैतन्य दाई प्रकाशमान.

ईश्वर एक आपण सगळे ईश्वराची लेकरे एक तर
मग भेदभाव कुठे व कसला आणी कशासाठी ?
द्वैत कुठे आहे ? सगळेच अद्वैत आहे.

तर मग संपूर्ण सजीव सृष्टी संपूर्ण मानव समुह वेगळा कसा ?
आपण तर सगळीच एकाच ईश्वराची लेकरे.
आपण सगळेच सनातनी ?
संपूर्ण ब्रम्हांड ही सनातनी.
संपूर्ण चैतन्य शक्ती ही एक , प्रकाशमान व सनातनी ?

तर मग भांडण कशासाठी ? वेगवेगळी दुकाने ?? कशासाठी ???
हा तर स्वार्थाचा , अज्ञानाचा आणी अहंकाराचा , मी तु पणाचा फापट पसारा ?

मग ? सनातन सोडून अहंकाराचा व्यर्थ फाफटपसारा कशासाठी ? कुणासाठी ?

चला तर मग अहंकार सोडून , अज्ञान सोडून , स्वार्थाचा व्यर्थ फाफटपसारा सोडून ,
सनातन शी जोडू या….
वेगवेगळी दुकाने मोडीत काढून वैश्विक स्तरावर सनातनचे प्रकाशमान वैश्विक पर्व आरंभ करू या.

वैश्विक महाक्रांती अभियान…द्वारे तुटत चाललेला सनातनचा संपर्क पुन्हा जोडू या…
संपूर्ण सृष्टी संतुलन करून , नव सृजन करू या…नव निर्माणाचा संकल्प करून , संपूर्ण पशु पक्षांनाही अभय देऊ या…
कारण ? सगळी एकाच भगवंताची लेकरे आपण , नवक्रांतीने पुन्हा एकरूप होऊ या.

नव युग आरंभ करु या.
संपूर्ण धरतीवर ईश्वराधिष्ठित सत्य सनातन धर्माची पुनर्स्थापना करू या.

चैतन्य दाई विश्व निर्मितीसाठी आपण सगळेच झोकून देऊ या.

भगवंताची धरती सगळी पुन्हा सुंदर , सुजलाम सुफलाम बनवू या.

संपूर्ण सजीवांना अभय देऊन , त्यांनाही जगण्याचा आनंद आणी अधिकार देऊ या…

*चला उठा तेजस्वी ईश्वर* *पुत्रांनो…*
*सत्य सनातन चे राज्य*
*संपूर्ण धरतीवर आणू* *या…*

संकल्प आणी अथक परिश्रम अशक्य गोष्टी ही शक्य करून दाखवतो…
*कारण हीच ईश्वर निर्मित* *सत्य सनातन* *धर्माची खरी* *शिकवण आहे.*

चला उठा संपूर्ण धरतीवर प्रकाशमान भगव्याचे राज्य पुनर्स्थापित करू या…

*विश्व स्वधर्म सुर्ये पाहो*
*विश्व स्वधर्म सुर्ये पाहो*

संपूर्ण सनातनचे साम्राज्य नव्हे तर,
*सत्य सनातन चे ईश्वरी* *राज्य*
स्थापू या…

याच साठी भगवंताने आपल्याला धरतीवर पाठवले आहे.
*प्रकाशपर्व!!!*

*जय हरी विठ्ठल*

🚩🚩🚩🚩

Related Post

Translate »
error: Content is protected !!