Thu. Feb 5th, 2026

देव दिनाघरी धावला

Spread the love

 

*तुम्ही फक्त* *श्रीकृष्णार्पणमस्तु* *म्हणा…*
✍️ २७७६

✅✅✅✅✅

आपल्या आयुष्यात आपण बरेच दुःख भोगत असतो.
ब-याच वेळा ते दु:ख असह्य देखील होते.

तर अनेक वेळा आपण अनेक प्रकारची सुखेही भोगत असतो.

पण जर ही सुखदु:खे आपण ईश्वराला सदैव साक्षी ठेवून भोगली तर नक्कीच आपले आयुष्य समाधानाने भरून उरते.

प्रत्येक वेळी, प्रत्येक सुखदुःखात आपण जर सगळेच ईश्वराच्या चरणावर अर्पण केले तर आपला मनावरचा बोझ हलका होतो.

म्हणूनच प्रत्येक वेळी *श्रीकृष्णार्पणमस्तु*
असे म्हटल्यास त्याचा साक्षीदार स्वतः ईश्वरचं होऊन जातो.

आर्थिक अडचणी आहेत…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
घरात सतत भांडणे होतात…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
आजारपणाचा असह्य त्रास होतो…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
गुप्त शत्रू अतिशय त्रास देतात…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
कुणी निष्कारण मानसिक छळ करतो आहे…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
कुणी अकारण द्वेष मत्सर करतो आहे…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*

पावलोपावली सगळ्या गोष्टी…
*श्रीकृष्णार्पणमस्तु*
म्हणून तरी बघा
बघा श्रीकृष्ण स्वतः तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होतो आहे.
तुमचे प्रत्येक दुःख हलके करतो आहे.

अनुभव घेऊन तर बघा.
किती मस्त आणी छान छान आयुष्य जगता येतंय ते.

एकदा श्रीकृष्णाला मनापासून हाक मारून तरी बघा , त्याला सगळे सुखदुःख अर्पण करून तरी बघा…
बघा कसं हलकं हलकं वाटतंय ते…

*श्रीकृष्णार्पणमस्तु*
केवळ या एका मंत्राने देव तुमचा दास होऊनच राहतो आहे, हे तुम्हाला पावलोपावली जाणवेल.

देवावर खरंखुरं , अगदी मनापासून , हृदयापासून अगदी बेंबीच्या देठापासून प्रेम करता आलं पाहिजे.

अहो देव खरंच भावाचा आणी ख-या प्रेमाचा भुकेला असतो हो.

त्याला धन, वैभव , आरती, नैवेद्य कांहीं कांहीं लागत नाही हो.
त्याला लागतं ते मनापासून प्रेम.
तीर्थ यात्रा करू नका , मंदिरात जाऊ नका , पण आपल्या ह्रदय मंदिरात मात्र त्याला अहोरात्र साठवून ठेवा.

मग बघा प्रत्येक प्रसंगात तो अगदी दुडूदुडू धावत येतो आहे ते.

अगदी तुमचं सगळं जीवनचं तो बदलवून टाकेल हो.

फार मोठा आहे देव.
देवाशप्पथ खरं सांगतो.
माझा अनुभव आहे हा.

म्हणूनच देवावर खरं प्रेम करून तर बघा.
अख्ख आयुष्य त्याच्या चरणावर अर्पण करून तर बघा.

मग काय ?
*आनंदाचे डोही*
*आनंद तरंग*
*देव शोधाया गेलो*
*देवच होऊनी बैसलो*
याची दिव्य प्रचिती पावलोपावली आल्याशिवाय राहणार नाही.

*कृष्णा कृष्णा*
म्हणून तर बघा.
टाहो फोडून त्याला आर्ततेने हाक मारून तर बघा.
प्रेमाने त्याला सगळे सुखदुःख सांगून तर बघा…
तो तर तुमच्या एका हाकेचीच वाट बघतोय.

देव दिनाघरी धावला
*वेडा कुठला देव.*

*या सुखा कारणे देव* *वेडावला , वैकुंठ सोडून* *दिनाघरी*
*धावला.*

एकनाथांच्या घरी नाही का ? श्रीखंड्या बनून पाणी वाहीलं त्यानं ?
तोच हा श्रीकृष्ण
माझा , तुमचा , अगदी सगळ्यांचा

दिसत नसला तरी वारंवार अनुभूती देतो ,
*रूप बदलुन ही वारंवार भेटायला * *येतो.*

*धन वैभवासाठी नाही* *तर देवासाठी वेडे* *व्हा.*

*कृष्ण कृष्ण*
*श्रीकृष्णार्पणमस्तु*

🙏🕉️🕉️🕉️🕉️

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!