Tue. Oct 21st, 2025

नोकरी करणारी मुलगी

Spread the love

*नोकरी करणाऱ्या मुलींचे* *वैवाहिक जीवन* *धोक्यात येत आहे* *का ?*

✍️ २७०७

🙊🙊🙊🙊🙊

मुलिंचे स्वातंत्र्य हा लोकशाही मध्ये एक विशेष हक्क समजला जातो.
आणी वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये तर मुलिंना कधिही बंधनात न ठेवता , देवीचा दर्जा देऊन , तीला सर्वोच्च स्थान दिले जाते , हे आपण जाणतोच.

नवरात्रात केले जाणारे कुमारी पूजन हे त्याचेच प्रतीक आहे.

आपल्या घरी मुलीचे आईवडील ही मोठ्या कोडकौतुकाने , प्रेमाने व लाडाने आपल्या मुलीचे संगोपन करतात.
मुलीला प्रेमाचे प्रतिक मानतात.

पण साधारणतः मुलगी सासरी गेल्यानंतर तीला तेच आईवडीलाकडील प्रेम मिळावे , अशी स्वतः मुलीची व तिच्या आईवडीलांची पण इच्छा असते.
पण सासरी गेल्यानंतर मुलीला तेच प्रेम देणे तर दूरच , उलट किरकोळ गोष्टीमधूनही त्या मुलीचा अनन्वित छळ चालू होतो.
आणि ती मूलगीही मग हळूहळू कोसळून पडायला लागते. आणि अशा मुलिंचे आईवडील ही.

विरोध करावा तर मुलीचे आयुष्य उध्दस्त होण्याचा धोका.
त्यामुळे सगळेच आयुष्यभरासाठी मुलीचा अनन्वित छळ,अन्याय, अत्याचार , उसासे सोडत सहन करत राहतात.

त्यामुळे एखाद्या मुलिला चांगले सासर मिळणे हा तिच्या भाग्याचाच विषय आहे. पण अशी उदाहरणे पण खूप विरळा आहेत.

सासरच्या अत्याचाराचा मुली खंबीरपणे कडाडून विरोध करतात. पण तिच्याच आईवडीलांचा तीला खंबीर पाठबळ व आधार मिळत नाही, हे सामाजिक दुर्देव आहे.
आणि त्यामुळेच मुली समाजात व पाव्हण्यारावळ्यात एकट्या, एकाकी पडतात.

समाज काय म्हणेल या भितीपोटी बरेच जण मुग गिळून गप्प बसतात.

मुलीला आधार देणारी ही सासरकडील कांही कुटूंबे असू शकतात. कांहीं मुलिंचा वैयक्तिक दोषही असू शकतो.
पण हे प्रमाण नगण्य वाटते.

समाजात प्रतिष्ठेच्या मोठमोठ्या गप्पा मारणारेही घरची सून म्हणजे कवडीमोल , अशा धारणेतून जगत असतात.

त्यामुळेच मुलींचा वेगळे राहण्याचा अथवा स्वतंत्र पायावर उभे राहण्यासाठी , व्यावसाय धंदा अथवा नोकरी करण्याचा कल वाढतो आहे.

कुणावर विसंबून जीवन नको,ही त्यामागची धारणा असू शकते.

त्यामुळे सध्या अनेक क्षेत्रात मुली अग्रसरपणे पुढे येण्याची क्षमता वाढीस लागली आहे.

आत्मनिर्भरता हा एक त्यामागील महत्वपूर्ण मुद्दा आहे.

परंतु साधारणतः जेंव्हा नोकरी करणा-या मुलींचा विवाह होतो , त्यावेळी विकृत मानसिकतेतून मुलींचा सासरकडून छळ होत असेल तर , संघर्ष निर्माण होतो.
आणि मुलाचे आईवडील ह्या संघर्षात ब-याच वेळा टोकाची भुमिका घेतात. अशावेळी संबंधित मुलीची अपेक्षा असते , की आपल्या जोडीदाराने तरी आपली बाजू घ्यावी.
पण इथेही जेंव्हा अपमानास्पद वागणूक जोडीदारच देत असेल तर संघर्ष टोकाची भूमिका घेतो.

अशावेळी त्या मुलीला स्वतः च्या आईवडीलांचा खंबीर व भक्कम आधार असेल तर ,अशा मुलीला अशा भयंकर दुष्ट चक्रव्यूहातुन बाहेर पडण्यासाठी मदत होते.

नोकरी करणाऱ्या मुली समजूतदारपणे संघर्ष टाळत असतात. पण तिच्या समजूतदारपणाचा काडीमात्र उपयोग नसेल तर काय करणार ?
तिलाही नोकरीचा ताण असतो.
ती ही दमून भागून आलेली असते. तिलाही मनभावना असतात , याचा कोणी विचारच करणार नसेल तर काय फायदा ?

तीने नोकरी करून सगळा पगारच नव-याच्या किंवा सासुसास-याच्या हातात द्यायचा , तिच्या कडे खर्चासाठी एक पैसा ही ठेवायचा नाही , उलट कामावरून आल्यावरही मोलकरणीसारखे घरचे कामधंदे करायचे , वर पुन्हा कांहीं चुकले की सासू सासरे , दीर ,नणंदा यांचे कुचके बोलणे , टोमणे अकारण सहन करायचे आणि वर पुन्हा आमची सून अशी आमची सून तशी अशा भयंकर सामाजिक बदनाम्या ? सहन करायच्या ? कशासाठी ?

अशावेळी साहजिकच मुलगी एकटी पडते.व आपल्या आईवडीलाकडे आशेने पाहते.

अजूनही समाजात विशेषतः आदर्श संस्कृती असणाऱ्या हिंदू धर्मात अशा सामाजिक विकृति ब-याच असाव्यात असे वाटते.

मुलगी म्हणजे वेठबिगार अथवा गुलाम नाही. तिलाही मन भावना असतात. तिलाही दुखणे खुपणे असते.तिलाही स्वातंत्र्य असते.तिलाही आनंदाने जगावे वाटते.
पण याचा सासरकडून एक टक्काही विचार होणार नसेल तर ? खटके हे उडणारच. व सामाजिक उद्रेक होणारच.

मुलगी म्हणजे , विशेषत: सून , बायको , गुलामच असते ,अशी धारणा असणाऱ्या , अशा विकृत समाजाला व विकृत व्यक्तिंना योग्य समाज प्रबोधनाची नितांत गरज आहे.त्यामुळे विस्कळीत समाजरचनेत विशेष बदल घडून येईल.

पण असे समाज प्रबोधनाचे विशेष प्रयत्न आमच्याकडून म्हणावे तसे केले जात नाहीत , हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

सासरी आलेली प्रत्येक मुलगी ही फक्त अत्याचार सहन करण्यासाठीच आलेली असते , ही सामाजिक धारणा बदलायला हवी.

तरच सुखी समाजाचे स्वप्न साकार होईल.

आध्यात्मिक गोष्टी करायच्या , देवधर्म करायचे , सामाजिक कार्य करायची आणि स्वतःच्या घरातच गुणवंत मुलींचा सुध्दा अनन्वित छळ करायचा ? हे योग्य नव्हे.

हे कुठतरी बदलायला हवं.हे दुष्टचक्र कुठतरी थांबायला हवं.

तरच सुधारित समाजाच्या गप्पा ठीक आहेत.नसता सगळ्या समाज सुधारणेच्या फुकाच्या बाता आहेत.

हे माझा लेख कुणाला एकतर्फी वाटत असेल तर त्यांनी माझ्याशी चर्चेसाठी यावे.
समाज प्रबोधन व सुखी समाज हाच लेखामागचा एकमेव उद्देश आहे.

त्यामुळे नोकरी करणाऱ्या मुलीमध्ये एकटे राहण्याची समस्या सुटण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

*रामकृष्णहरी*

🙏🙏🙏🙏🙏

*विनोदकुमार महाजन*
( *अंतरराष्ट्रीय पत्रकार ,* *मुंबई )*

Related Post

Translate »
error: Content is protected !!