*महापुरुष !!*
💎💎💎💎💎
✍️ ( लेखांक )२६१६
ज्यावेळी एखाद्याच्या आयुष्यात अति भयावह घटना घडतात,जीवन मरणाचे सतत प्रसंग उद्भवतात,त्यावेळी ती व्यक्ति हतबल होऊन आयुष्यातुनच उठते.
जर एखाद्या निष्पाप व्यक्तिचा कोणी वैयक्तिक राक्षसी स्वार्थासाठी , अनन्वीत , असह्य मानसिक छळ करून, त्यालाच उलटा भयंकर व चौफेर बदनाम करून , आयुष्यातून, माणसातून,समाजातून,
नात्यासंबंधातून उठवण्याचा अहोरात्र प्रयत्न करत असेल ,तर हे अति भयावह व असह्य होय.
विशेषतः अनेक महापुरूषांच्या बाबतीत, विशेषतः आदर्श सनातन हिंदू धर्मातच अशा घटना घडत असतील तर ती नक्कीच धर्मग्लानी होय.
आद्य शंकराचार्य , ज्ञानेश्वर महाराज , शिवाजी महाराज अशी अनेक उदाहरणे आपल्याच धर्मात सापडतील.
पण महत्त्वाचे म्हणजे अशा अति भयावह व असह्य कुठाराघातून सावरून सुध्दा , असे महापुरुष आपल्या वैयक्तिक कार्याने व धगधगत्या ईश्वरी तेजाने इतिहास घडवतात व अजरामरही होतात.
इतिहास साक्षी आहे.
भक्त प्रल्हाद व हिरण्यकश्यपू हे याचे ठळक उदाहरण आहे.
ध्रुव बाळ हेही यातले आदर्श उदाहरण आहे.
।। जय जय रामकृष्णहरी ।।
*विनोदकुमार महाजन*
💎💎💎💎💎