” काळजी करू नको बेटा ? ”
” काळजी करू नको बेटा .
वाघाच्या काळजासारखा हा तुझा बाप आहे . आणी रात्रंदिवस तुझ्या पाठीशी उभा आहे .
अन्यायाविरुद्ध हिमतीने
लढत रहा . ”
अस एखादा बाप जेंव्हा पोराच्या पाठीवर हात टाकून बोलतो
तेंव्हा त्या ” लेकराला ”
हजारो हत्तीचे बळ मिळते.
पण एखादा बाप क्रूरपणाने बालपणीच एखाद्या मुलाचा जीवघेणा मानसिक छळ करून , त्याचे उभारीचे पंख वारंवार छाटतो , आणी ?
त्या लेकराचं उभ आयुष्यच बरबाद करतो ?
अशा कमनशीबी पोरांचे उभे आयुष्यच पार बरबाद होते , अन् सगळे जीवनच जणू नरकतूल्य बनते.
अशी कमनशीबी पोरं भरपूर सापडतील या देशात ?
पण अशा महाभयानक जीवघेण्या प्रसंगातून ही जो मुलगा स्वतःला सावरतो अन् हिमतीने लढून काळ आपल्या हातात आणतो ?
तो ? कदाचित ?
जगावर राज्य सुध्दा करू शकतो.?
( भक्त रक्षक नृसिंह भगवान की जय. )
विनोदकुमार महाजन