Wed. Oct 30th, 2024

जग मला हसेल का ?

Spread the love

*जग मला हसेल का ?*

✍️ लेखांक : – २५२२

*विनोदकुमार महाजन*

😂😂😂😂😂😂😂

दुनियादारी आणी रिश्तेदारी फार विचित्र असते भावांनो .
तुम्ही कसं जरी वागंल ना ? तरी ही दुनिया तुम्हाला नावेच ठेवणार , हे पक्के ध्यानात ठेवा .
अगदी ईश्वर स्वरूप बनून जगावर जरी उपकार केले तरी जग हे तुम्हाला हसणारचं . तुमचे दोष काढणारचं . तुम्हाला चक्क वेड्यातसुध्दा काढणारचं .
त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला पुढे जायच असेल , मोठ्ठ व्हायच असेल , फार मोठ्ठ नांव कमवायचं असेल तर विचित्र दुनियादारीचा आधी विचार करन सोडा . मला जग नांव ठेवेल , हसेल असा विचार करणं सोडून द्या . आणी बिनधास्त होऊन ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवा .

दुनिया फार क्रुर आहे मित्रांनो .
मी स्वतः अनुभवलं आहे .

दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा , जसंजसं तुमचं चांगल होत राहिल , तसतसी दुनिया तुमच्यावर जास्तीत जास्त जळत राहील , तुमच्या कार्यात विघ्न टाकिल , तुम्हाला चौतरफा बदनाम करेल , अगदी तुमचं जगणं मुश्कील करेल , तुम्हाला असह्य नरकयातना देऊन सदैव ढसढसा रडवेल सुध्दा . तुमच्या वाटेत काटे टाकणं , हाच दुनियादारीचा स्वभाव आहे .
संकटकाळात तुम्हाला कोणीसुध्दा मदत तर करणार नाहीच , उलट ज्यांना संकटकाळात आधार दिला तेही तुम्हाला असह्य यातना देतील , हे ध्यानात ठेवा .

ईश्वर फार दयाळू आहे . पण त्याच ईश्वराने निर्माण केलेला , एवढासाच मेंदू असणारा , मनुष्य नावाचा प्राणी ? फार महाभयानक आहे , हे नक्की .
हा मनुष्य तुम्हाला कसंच जगु देणार नाही .

एखादा रस्याने वेडा होऊन फिरायला लागला तर त्या वेड्याला सुध्दा छळतील हे लोक , त्यालासुध्दा मानसिक त्रास देतील , पण त्याला कोणी आधार देणार नाही , अथवा फुकटचे मायेचे दोन शब्द सुध्दा कोणी देणार नाही , एवढी दुनियादारी महाभयंकर आहे .

त्यामुळे जग मला हसेल , नांवे ठेवेल असला विचार सोडून जगायला शिका . तरच तुम्ही आनंदाने जगाल .

आणी ह्या क्रूर जगाचा तुम्ही विरोध कराल , आणी तुम्ही कितीही खरे असाल , तरीसुद्धा दुनियादारी तुम्हाला जास्त त्वेषाने छळतच राहील , हे पण लक्षात ठेवा .

मोठमोठ्या महापुरूषांना या महाभयानक दुनियादारीने कच्चा सोडले नाही , तर मग तुम्ही आम्ही कोण आहात ?
तुम्हीआम्ही कोण आहोत ?

त्यामुळे बिनधास्त जगा .
जगात सुखाने जगायचं असेल तर , क्रूर अन् मतलबी जगाचा विचार सोडून द्या .

जीते है शानसे .

हरी ओम्

🙏🕉🚩🙏🕉🚩

Related Post

Translate »
error: Content is protected !!