Sat. Nov 23rd, 2024

कपटी लोकांना ओळखा

Spread the love

*कपटी लोकांपासून सावधान ?*

ज्याच्या पोटात तुमच्याबद्दल सतत कपटभावना आहे ,
अशावर प्रेम करून अथवा त्याला सहकार्य करून तरी काय उपयोग ?

अशा व्यक्तिपासून सावध व्हा व
कायमस्वरूपासाठी व आयुष्यभरासाठी अशा कपटी लोकांचे संबंध पूर्णपणे तोडून टाका.

तरच आणी तरच तुम्हाला सुखाचे चार दिवस जगता येतील.
अन्यथा अशी कपटी लोकं तुमचा कधी घात करतील व जीवन बरबाद करतील हे
सांगता येणार नाही.

भगवान श्रीकृष्णाने सुध्दा कपटी व दुष्ट लोकांपुढे हात टेकले होते , हे लक्षात ठेवा.
कृष्णशिष्टाईसाठी स्वतः परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे गेला होता.
संघर्ष व रक्तपात नको म्हणून ईश्वर सुध्दा स्वतः सतत प्रयत्न करत होता.

पण कपटी व दुष्ट दुर्योधनाने श्रीकृष्णाशीसुध्दा कसा व्यवहार केला हे आपणास माहिती आहे.

म्हणून दुष्ट व कपटी लोकांपासून सदैव सावध व दूर राहणेच नेहमी हितकारक असते.

म्हणूनच चेहरे वाचायला व ओळखायला शिकलं पाहिजे.
तरच ईश्वरी कार्यात यश मिळेल.

तात्पर्य : – कपटी , ढोंगी , मायावी व दुष्ट लोकांपासून सदैव सावध रहा.

जय श्रीकृष्णा !!

*विनोदकुमार महाजन*

Related Post

Translate »
error: Content is protected !!