Sun. Nov 24th, 2024
Spread the love

कृष्ण ! ! !
कृष्ण कुणाचा ?
माझा की तुमचा ?
राधेचा की अर्जुनाचा ?
एकदा एका नात्यापासून दूर गेला की पुन्हा परत कधी फिरलाच नाही !
का ?
सगळ्यात राहुनही सगळ्या पेक्षा वेगळा देव !
साक्षात भगवान विष्णुचा अवतार !
ज्याला कृष्ण कळाला तो…
जीवनाची लढाई जींकला !
अन् ज्याला कृष्ण कळालाच नाही तो ?
कृष्णालाच माहिती !

विनोदकुमार महाजन

🍁 तो राधेच्या आयुष्यात होता …
आणि अर्जुनाच्याही…!.

💖 प्रेम त्याने राधेवरही केले …
आणि अर्जुनावरही..!

राधा आपली नव्हती,
आणि होणारही नाही ..?
याची पूर्ण जाणीव त्याला होती
आणि युद्धात अर्जुन जिंकूनही ….
आपला काहीही फायदा होणार नाही,
ही पण जाणीव त्याला होती..!
मात्र हे असूनही त्याने ही दोन्ही नाती अतिशय समरस होवून निभावली !!

एकदा गोकुळ सोडल्यावर
परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही,
आणि राज्याभिषेक झाल्यावर …
अर्जुनाच्या आयुष्यात ही तो परत कधीच आला नाही!
अत्यंत उत्कटपणे नाती निभावूनही
त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला…!
परत कधीच परतून न येण्यासाठी !!
त्याची त्याला कधी खंत वाटली नाही …
ना कधी खेद झाला …!

राधे बरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले,
लोकापवादाला सामोरा गेला.
तरीही त्याचे बासरीचे सुर कधी बहरले नाहीत,
असे कधीच झाले नाही …!!

ज्या उत्कटतेने त्याने
राधेसाठी बासरी वाजवली आणि ..,.
तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला
तसाच अर्जुना बरोबर युद्ध करताना
कुरुक्षेत्रही आपल्या अफलातून डावपेच,
आणि कुट नीतीने गाजवले…!

राधेला तो जीवन का आणि कसे जगायचे?
हे कोमल होवून सांगत असे.
त्याच आपुलकीने अर्जुनला
शत्रूस कसे आणि का संपवायचे ?
हेही सांगितले ,
एका पेक्षा एक अभेद्य, अमर आणि महावीर योद्धे
त्याने लीलया वरती ढगात पाठवले ..!
जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना
त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता..!

ज्या हळूवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत…
त्याच हळूवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्रही चालवत असत..!

हे सर्व करताना,
नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही.
कारण…..
कारण तो कृष्ण होता ….
संभवामी युगे युगे असे त्याचे स्वतःचे वचन होते…!
तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता.
आहे आणि राहील…
गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या
त्या कृष्णाला ओळखण्याची..!

🙏🏼
*।। जय श्री कृष्णा ।।*

*लेखक अज्ञात

Related Post

Translate »
error: Content is protected !!