माझी गरीबी मला प्यारी आहे
————————————-
नको राजमहालाचा हव्यास
नको श्रीमंतीचा थाटमाट
माझी झोपडी मला प्यारी आहे
माझी गरीबी मला प्यारी आहे
श्रीमंतीच्या थाटमाटात सगळ
नाटक आहे
राजमहालात अहंकाराचा दर्प आहे
पण माझ्या झोपडीत मला नित्यदिन भगवंताचा सहवास आहे
म्हणून नको मला राजमहाल
नको ती अहंकारी श्रीमंती
माझ्या झोपडीतच माझ
राजऐश्वर्य आहे
झोपडीत सुख आहे
अन् महालात दु:ख आहे
म्हणूनच मला माझी झोपडी प्यारी आहे
कारण मी इथे माझ्या मनाचाच राजा आहे
कुणाची हुजरेगिरी नाही अथवा कुणाची हांजी हांजी नाही
म्हणूनच मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे
————————————-
विनोदकुमार महाजन