*कृष्णा, तु कुठे आहेस रे !*
कृष्णा,सत्य तडफडत आहे,
तु कुठे आहेस ?
तु तर गोपालक,गोरक्षक आहेस ना रे ?
मग तुझ्या गाई दररोज हजारों च्या संख्येने पृथ्वीतलावर तडफडत आहेत.
त्यांना तडफडून मारलं जात आहे.
त्यांच्या रक्ताचे.पाटचे पाट वहात आहेत.
कृष्णा,दररोज त्या तुझं नांव घेऊन, टाहो फोडून, हंबरडा फोडून, तुला हाका मारतायत.
तुला त्यांचा आर्त आवाज,हंबरडा ऐकू येत नाही का रे गोपाला ?
कुठं आहेस तु कृष्णा ?
निष्पाप जीवांना वाचवण्यासाठी तु धावून येणार आहेस की नाही रे बाबा ?
कुठं आहेत तुझ्या भगवत् गीतेमधली ती वचनं ?
एवढा दगडासारखा कठोर का बरे झालास देवा तु ?
की पंढरपुरात विठ्ठल होवून डोळे मिटून घेतलेस ?
एवढा कठोर, निष्ठूर नको नारे होवू भगवंता।
डोळे उघड पांडूरंगा।
धर्म रक्षणासाठी,सत्य रक्षणासाठी, अधर्माचा नाश करुन, निष्पाप जिवांना,हजारो, लाखो,करोडो गोमातेला अभय देण्यासाठी अवतीर्ण हो देवा आता।
दुसरा पर्याय नाही पांडूरंगा।
डोळे उघड।
ज्वाला नारसिंव्हासारखं भयंकर उग्र रूप धारण करून,
एकेक पापी,उन्मत्त, उन्मादी गौहत्या-यांना यमसदनी पाठवण्यासाठी ज्वाला होऊन धावत ये रे भगवंता, विठ्ठला,पांडूरंगा।
गोमातेची करून हाक ऐकून,
कल्की बनून धावत येई,
*विष्णू देवा।*
धाव घेई रे विठ्ठला।
धाव पाव रे पांडूरंगा।
हरी ओम्
*विनोदकुमार महाजन*