
*भैयु महाराज by शरद उपाध्ये*
गुरुत्वाची गादी काटेरी आसन आहे. आपणहून त्या गादीवर बसून आपल्या मनाने कोणालाही कसलीही उपासना करायला सांगणे म्हणजे त्याचे प्रारब्ध ओढवून घेणे आहे.आपली उपासना आधी प्रखर होऊन सद्गुरू प्राप्त होतात आणि त्यानी अनुग्रह देऊन आज्ञा केली तर दुस-याला उपासना देण्याचा अधिकार प्राप्त होतो.
उठसूठ कोणालाही काहीही साधना करायला सांगणे हे स्वतःवर संकटे ओढवून घेणे आहे. मी आणि भैयुमहाराज गुरूबंधू होतो. आमचे आणखी एक गुरुबंधू विवेक किरपेकर अशा आम्हा सर्वांना सद्गुरू आवर्जून सांगायचे, “गुरू,महाराज बनून आपल्या पायावर कोणाचे डोके ठेवून घेऊ नका.महाराज बनण्याच्या भानगडीत पडू नका लोकांची खडतर प्रारब्धे घ्यावी लागतील.” पण गुरूवाक्य जो न करी तो पडे रौरव घोरी.
किरपेकर अनेकांकडून पैसे घेऊन त्यांच्या पितरांची श्राध्दकर्मे काशीला जाऊन करू लागले. एके दिवशी त्यांना महाऊग्र काळपुरुषाचे दर्शन झाले. घाबरून त्यांनी सद्गुरूंना फोन केला. सद्गुरू म्हणाले आता संपले. अंत अटळ आहे. तुम्ही पितरांच्या अर्यमा देवतेच्या प्रांतात ढवळाढवळ केली आहे. किरपेकरांची मुत्रपिंडे खराब होऊन आठ दिवसात मृत्यू ओढवला
“माझे कोणीही गुरू नाहीत. मी स्वयंभू आहे” असे म्हणणारे शिष्य गुरूद्रोही ठरतात आणि भयाण अंत होतो. म्हणून अधिकारी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःची उपासना करत रहाणे उत्तम. लोकांनी महाराज बनवून उपयोग नाही. त्या महाशक्तीने गुरुत्वाच्या गादीवर बसवले पाहिजे. लोकेषणा, वित्तेषणा सर्वांचा त्याग केला पाहिजे.
सतत सद्गुरूंशी संपर्कात राहिले पाहिजे. मध्यंतरी मधुर भांडारकर यांच्या मार्फत एका परलोकांतील गतिसंबंधी फिल्ममध्ये मला भूमिका करण्यासाठी खूप आग्रह केला होता पण मी सद्गुरूंची परवानगी मागितली तर त्यांनी त्वरित नकार दिला.
पण अनुग्रह मिळाला म्हणून आपल्या मनाने लोकांकडून पैसे घेऊन यज्ञयाग करायचे याची फार अशुभ फळे भोगावी लागतात कारण त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते. अनुग्रहित शिष्याची जबाबदारी गुरूंवर असते पण त्यांच्याशी संपर्क न ठेवता आपणच महाराज म्हणून मिरवणे फार महागात पडते.
म्हणून म्हंटले आहे “पानी पीना छानके! गुरू करना जानके!” पण एकदा गुरू केले की सतत लक्षात ठेवावे “न गुरोर् अधिकं न गुरोर् अधिकं”
भैयूजी, आत्महत्येने समस्या समस्या संपत नाहीत आणि आत्महत्या हा महादोष आहे हे तर आपण जाणतच होतात. मग केवळ ताण असह्य झाला म्हणून आपली आई,पत्नी यांना एकाकी सोडून जाणे हे सामान्यांचे दुबळेपण नाही का?
गुरूंनी एवढे सामर्थ्य,मनोबल दिले असताना एकदा त्यांच्याशी तरी संपर्क साधायचा! ते गुरू अशक्यही शक्य करतात. ‘महाराज’ म्हणतात आपल्याला, तर लाखो लोकांना पोरके का करायचे!
माझ्या कुटुंबाची काळजी घ्या हे लोकांना का सांगायचे?
ती महाशक्ती आहे ना! पण ज्या महादेवांना आपण अखेरची प्रार्थना केली आहे त्यांनी ‘कालकूट’ पचविले आहे. त्यांना आत्महत्या रुचणार नाही. अध्यात्मिक माणसाची एक विलक्षण खंबीर, आदरणीय, आधार देणारी, लढवय्या माणसाची प्रतीमा असते. लष्कर प्रमुख आघाडीवर असला पाहिजे. तर सैनिकांना बळ मिळते.
असो.
आपल्या जाण्याचे दुःख मला झालेच आहे पण जनतेच्या श्रध्देला तडा जातो त्याचे फार वाईट वाटते. ज्याच्यावर भार टाकला तो असे जीवन संपवितो हे अध्यात्म क्षेत्राला नुकसानकारक ठरू शकते.
वीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, संभाजी राजे यांनी काय सोसले! पण टक्कर दिली. आत्महत्या नाही केली.
असो.
गुरू प्रेमळ असतात. ते आपल्याला सद्गती देतीलच कारण तसे आपले इतर समाज कार्य महान आहे. सरकारी सुविधा नाकारण्याइतके निरिच्छही होतात. आम्ही तुमचे सर्व गुरूबंधु भगिनी तुमच्या उत्तरगतीसाठी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो.
🙏
मित्रमैत्रिणींनो सामान्य जीवन जगण्यातच फार समाधान असते. फार उंचावर गेल्यावर आपण प्रेमळ जनतेपासून दुरावतो. पडलो तर जखमाही गंभीर खोल होतात. अध्यात्म स्वतःपुरते ठेवा. अधिकार नसताना सल्ले देत बसू नका. हत्ती होऊन अंकुशाचा मार खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी.
*लेखक : श्री.शरद उपाध्ये*
साभार फेसबुक वॉल
————
मेरे सद्गुरु मेरेही दादाजी,आण्णा…जिन्होंने मुझे उनके देह त्यागने के बाद भी अनेक दृष्टांत दिये,दर्शन दिये,गायत्री मंत्र दिया..
केवल “आण्णा “,नाम के दिव्यमंत्र से ही मेरा जीवन सँवारा..मेरे हमेशा देह त्यागने के बाद भी आँसु पोंछे,मार्ग दिखाया ऐसे साक्षात ईश्वरी अवतार, ब्रम्हांड से भी महान…
ऐसे मेरे दिव्यपुरूष आण्णा को यह मेरी उपरी पोष्ट समर्पित…
हरी ओम…
— विनोदकुमार महाजन।
