
*पाषाणह्रदयी…*
✍️ २८३८
*विनोदकुमार महाजन*
🫣🫣🫣🫣
समाजात कांहीं
अशीही क्रूर माणसे असतात की असे वाटायला लागते की ,
या माणसाला ह्रदय आहे की नाही ?
कुणी अशा माणसांना पालथ्या काळजाचा अथवा उलट्या काळजाचा पण म्हणतात.
अशा माणसांच्या ह्रदयामध्ये दया , माया , प्रेम , आपुलकी , वात्सल्य कांहीं कांहीं नसतेच.
उलटपक्षी एखादा चांगला व्यक्ती संकटात सापडला , अडचणीत सापडला तर ? अशा क्रूर माणसांना अत्यानंद तर होतोच होतो , तो त्यांचा अत्यानंद बोलुनही दाखवतात.
आपण अशा पालथ्या काळजाच्या माणसांवर कितीही प्रेम करा , कितीही चांगुलपणा दाखवा , यांच्या वर किती ही उपकार करा ,यांना कितीही सहकार्य करा , अशा क्रूर माणसांवर तसुभर अथवा काडिमात्र ही फरक पडत नाही.आणी त्यांचा उपजत गुण , क्रौर्य ते कधिच सोडत नाहीत.
कांहीं माणसे अत्यंत हळवी व दयाळू असतात ही , परोपकारी ही असतात.पण कदाचित त्यांच्या आयुष्यात अशा प्रेमळ , दयाळू माणसांच्या आयुष्यात ब-याच वेळा एवढे भयावह आणी विपरीत प्रसंग येतात की ते अनायासे ही क्रूर होऊन जातात.
बालवयात एखाद्या हळव्या मुलाचा भयंकर मानसिक छळ हेतुपुरस्सर केला गेला असेल , तो ही स्वकीयाकडून ? तर अशी मुले सुद्धा भविष्यात प्रतिशोध घेण्याच्या भावनेने क्रूर , अबोल , एकाकी बनू शकतात.?
हे एकवेळ समजण्यासारखं आहे.
पण कांहीं माणसे उपजतच एवढी भयंकर क्रूर असतात की , त्यांना पाषाण ह्रदयी म्हणूनच संबोधले जाते.
समाजात आज अशी पालथ्या काळजाची माणसे जागोजागी व ब-याच ठिकाणी पहायला मिळतात.
समाज मन बोथट झाले आहे का ? समाज संवेदनाशून्य बनतो आहे का ? आणी विशेष म्हणजे अशा क्रूर लोकांची संख्या वरचेवर प्रचंड वाढते आहे का ?
यावर दुमत असु ही शकेल.
पण उघडे नागडे सत्य कोणीच नाकारू शकत नाही.
स्वार्थांधतेने कदाचित एखादा व्यक्ती असा क्रूर होऊ ही शकतो , परंतु त्यांच्या ही ह्रदयात कदाचित दया माया असु शकेल.
पण क्रूर आणी पाषाण ह्रदयी माणसांच्या ह्रदयामध्ये दया माया नावाची चिजच नसते.
इतिहासात मागच्या कांहीं वर्षापुर्वी लहान लहान निष्पाप मुलांच्या सुध्दा अतिशय भयावह पद्धतीने आणी क्रूरपणे सामुहिक कतली केल्या गेल्या आहेत , हे कशाचे द्योतक आहे ?
आणी आजही ब-याच ठिकाणी असे घडते आहे ?
आणी समाज अशा घटना घडत असताना सुद्धा पेटून उठत नाही तर ? षंढासारखा मूग गिळून गप्प बसतो आहे ?
म्हणजे समाजही ह्रदयशून्य , पाषाण ह्रदयी आणी क्रूर बनतो आहे का ?
मग कारणे कांहीही असोत.
आणी आज समाज याची कारण मिमांसा पण करत नाही.
नात्यागोत्यातही अशी क्रूर आणी उलट्या काळजाची माणसं ब-याच वेळा बघायला मिळतात.
नात्यातील एखादा व्यक्ती, सद्गृहस्थ अडचणीत सापडून तडफडून मरत असेल तर ? त्याला सहकार्य करणे तर दूरच , तो दु:खातिरेकाने तडफडून मरतो आहे , याचा आनंदोत्सव साजरा करणारी क्रूर माणसे आज आपल्या समाजातच केवळ नव्हे तर ?
नात्यातही सापडत आहेत ?
कुठं चाललाय आपला समाज शेवटी ?
विनाशाकडे ?
एवढंच नाही तर ब-याच ठिकाणी भगवे कपडे घालणारे , तपस्वी महापुरुष , सिध्दपुरूष यांचा सुध्दा समाजात ब-याच वेळा हेतू पुरस:र् सामुहिक छळवाद केला जातो आहे ?
आश्चर्य आहे ना ?
निष्पाप, अनाथ ज्ञानेश्वर माऊली आणी ती बहीण भावंडे याचे हे एक भयावह उदाहरण आहे.सातशे वर्षांपूर्वी ची ही अवस्था होती तर ?
आज तर ? समाजात किती भयावहता पसरली असेल याचा विचारच करवत नाही.
एका तीर्थ क्षेत्रावर माझ्या समोर घडलेली एक सत्य घटना आहे.
एक कठोर तपस्वी त्या तिर्थक्षेत्री कठोर तपश्चर्या करायचा.
त्याच्या तपश्चर्येमुळे साहजिकच तो प्रचंड लोकप्रिय होऊ लागला.
पण झालं काय तर ?
त्या तिर्थक्षेत्रातिल प्रस्थापित बांडगूळं ,या सत्पुरूषामुळे प्रचंड अडचणीत येऊ लागली.
आणी मग सुरू झाला त्या तपस्व्याला बदनाम करण्याचा , अडचणीत आणण्याचा , पावलोपावली नडवण्याचा भयावह क्रूर खेळ.तो ही स्वतः हिंदू म्हणवून घेणाऱ्या कडून ? आश्चर्य आहे ना ?
त्याला ही बांडगूळ म्हणू लागली , ” तु सारखा जप तप का करत असतोस ? शेण का खात नाहीस ? तुझ्या अंगावर गाडी घालून संपवून टाकू…”
इत्यादी इत्यादी…
आज ही भगवंताचे भगवे कपडे परिधान करणा-या वैराग्य मुर्तींना सुध्दा , कांहीं नतद्रष्ट, विकृत हिंदुंकडूनच जाणीवपूर्वक
” टार्गेट ” केलं जातंय अथवा भगवंताचे नामस्मरण करणारे निष्पाप जीव सुद्धा आज कांहीं क्रूर माणसांकडून , ते ही हिंदू कडूनच अडचणीत आणले जात असतील तर…?
विचार करा बांधवानों.
खरंच समाजात एवढं भयावह क्रौर्य असू शकतं का ?
समाज खरोखरीच एवढा भयंकर अंध:पतीत होऊ शकतो का ?
आपलीच माणसं आपल्या चांगल्या माणसांच्या जीवावर उठतात हे इतिहासात वाचलं होतं पण ? अगदी आजही समाजात हेच घडतं आहे का ?
एवढं भयंकर क्रौर्य ?
विचार करा…
कुठे चाललाय आपला समाज शेवटी ?
विनाशाकडे ?
की कलियुगाच्या अंताकडे ?
आपल्या आसपास डोळसपणे आपण एक गुप्त नजर जरी फिरवली तरी एवढे भयावह सामाजिक अंध:पतन पाहून खरेच आत्मग्लानी येते आणी आत्मक्लेश ही होतात.
खरंच भगवंताने एवढं महाभयंकर क्रौर्य दाखवण्यासाठीच मनुष्य प्राणी निर्माण केला आहे का ?
आणी याला अंतिम उत्तर काय आहे ?
हे संपणार आहे की नाही ? कधी ?
की शेवटी भगवंतच समाजातील हे भयावह क्रौर्य संपवण्यासाठी , नारसिंव्हासारखा क्रूर होऊन , अधर्म संपवण्यासाठी अतिशय क्रौर्य धारण करून , क्रूर दुष्टांचा , क्रूरपणे नाश करणारा , कल्की अवतार म्हणून लवकरच अवतरीत होईल ?
न जाणो कदाचित ईश्वरी रचना अशी ही असु शकेल.
कदाचित कल्की अवतार धरतीवर आला ही असेल.व गुप्त रूपाने आपले कार्य वाढवत ही असेल.
ईश्वराची रचना ईश्वर जाणे.
पण एवढं मात्र नक्की की ,
” लोहे को लोहा ही काटता है…”
प्रेमाने क्रूर माणसं जींकता येत नाहीत तर त्यासाठी , श्रीकृष्णासारखं क्रूर होऊनच कालीयाचा , दुर्योधनाचा आणी क्रूर सख्खा मामा , कंसाचा नेहमीसाठी नाश करावाच लागतो.
तेंव्हाच सत्य जींकत.
तेंव्हाच धर्म जींकतो.
तेंव्हाच ईश्वरी सिद्धांताचा विजय होतो.
बघु या…भविष्याच्या उदरात भगवंताने काय काय लिहून ठेवलंय ते ?
पण अधर्माच्या नाशासाठी , संपूर्ण धरतीवर , अदृश्य ईश्वरी हालचाली मात्र वेगात आहेत एवढं मात्र नक्की.
*जय हरी विठ्ठल*
🤫🤫🤫🤫
