Mon. Jun 29th, 2026

सत्याच्या मागे संकट ?

*नेहमी ? चांगल्या* *माणसांच्या मागेच संकटे* *का* *लागतात…???*
✍️ २८९७

*विनोदकुमार महाजन*

💔💔💔❓

चांगल्या माणसांच्या मागेच नेहमी संकटे मागे लागतात ? हे आपणास मान्य आहे का ?
मान्य असेल तर हा लेख नक्की वाचा.

तसं पाहिलं तर कलियुगाचा न्याय अगदी उलटा आहे.
तुम्ही जेवढं खरं , सत्य , चांगलं वागाल त्याला हमखास जास्त दुःख , संकटे , अडचणी , त्रास , यातना भोगाव्याच लागणार आहेत.
हे मनाशी अगदी पक्के ठरवून ठेवा.
आणी चांगुलपणा न सोडता जादा संकटे व दु:ख भोगण्याची मनाची तयारी ठेवा.
पश्चात्ताप न करता.
ईश्वर साक्षी ठेवून.

आणी ? कलियुगात नेहमी जो राक्षसी आचरण करेल त्याला मात्र भरभरून यश , धन नक्कीच मिळेल.

कलियुगाचा उल्टा न्याय.

म्हणून , हे असं जरी असलं तरी ? चांगला माणूस वाईट वागू शकत नाही.आणी ? वाईट माणूस चांगला वागू शकत नाही.

आणी चांगल्या वाईटाचं वैर हे सर्वश्रूतच आहे.
राम – रावण
कृष्ण – कंस
पांडव – कौरव
भक्त प्रल्हाद – हिरण्यकश्यपू

आता हे असं का घडतं याचं विश्लेषण करू.

तुम्ही जेवढे देव , धर्म जास्त कराल , तेवढी संकटे जादा का ? हे असं का ?
सगळंच विपरीत कसं ?
असा प्रश्न पडणं पण सहज स्वाभाविक आहे.

ईश्वर प्राप्ती साठी साधना असेल तर ?
ईश्वर हा सहजासहजी आपल्या जवळ कोणालाच येऊ देत नाही.
अनेक अग्नी परीक्षा , कठोर सत्व परीक्षा बघितल्याशिवाय आणी त्यात उत्तीर्ण झाल्याशिवाय ईश्वर आपले दर्शन देत नाही अथवा कृपा ही करत नाही.
त्यामुळे ईश्वर प्राप्तीची ओढ असणारांनी नेहमीच दु:ख भोगण्याची मानसिक तयारी ठेवलीच पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे
सत्याचा रस्ता हा नेहमीच खडतर असतोच असतो.
तलवारीच्या धारेवर चालून पाय रक्त बंबाळ होणे म्हणजे ?
सत्याचरण होय.
युगानुयुगे हा सिद्धांत लागू पडतो.

त्यामुळे श्रीराम , श्रीकृष्ण या अवतारी महापुरूषांना देखील अत्यंत दु:ख भोगावेच लागले.
सत्याच्या आणी धर्माच्या रक्षणासाठी प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सुध्दा स्वतःच्या यादव कुळाचा संहार तर उघड्या डोळ्यांनी बघावाच लागला , याशिवाय कौरव पांडवांचा संहार देखील बघावा लागला.
आणी स्वतःचा देह ? अवतार कार्य समाप्ती सुध्दा अतिशय दुर्देवी ?
श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते अवतार समाप्ती पर्यंत फक्त दु:ख आणी दुःखच भोगावे लागले.

रामाचा वनवास तर सर्वश्रुतच आहे.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे , आपण जेवढे असह्य दुःख भोगू तेवढे आपले मागचे पुढचे सगळे कर्म जळत असते. कर्म भोग…
व जन्मोजन्मी साठी आपणाला दिव्य देह प्राप्त होत जात असतो.

आणी ईश्वराचा व सद्गुंरूंचाही आपल्याला दिव्यत्वाकडे नेण्यासाठीचा एक अथक प्रयास असतो.
अत्यंत कष्टदायक व असह्य जीवन देऊन.

म्हणून गुरूमंत्र घेतला की सर्व प्रथम आपली संकटे अतिशय वेगाने वाढायला लागतात.
म्हणूनच हताश , उदास होऊन अथवा अन्य कारणाने गुरूवरील व ईश्वरावरील अतूट श्रध्दा कधिही ढळू देऊ नये.
देह गेला तरी चालेल पण सत्याचरण व खडतर साधना कधिही सोडू नये.अथवा मध्येच अर्धवट साधना सोडून दूसरा रस्ता धरू नये.

साधना पूर्ण झाल्यानंतर आणी ठराविक जप पूर्ण झाल्यानंतर सिध्दी हमखास भेटतातच.
पण सिध्दित न अडकता पुढील उद्दीष्ट पुर्तीसाठी खडतर साधना ही सुरूच ठेवावी लागते.

संकटे पुन्हा वाढतील हे नक्की.
अंतिम ध्येयपुर्तीपर्यंत अथवा पुर्णत्व प्राप्ती पर्यंत अनेक दु:ख व यातना , आत्मक्लेश हे भोगावेच लागतील.

स्वकीयांचा भयंकर विरोध , सामाजिक उद्रेक , अनावश्यक व असह्य बदनाम्या , कांहीही दोष नसताना स्विकाराव्याच लागतील.

प्रत्येक महापुरूषांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा आणी अत्यंत क्लेशदायक टप्पा ठरलेला असतोच असतो.

म्हणूनच चिडून जाऊन अथवा रागा वैतागाने सत्याचरण अथवा साधना मध्येच अर्धवट सोडू नये.

दुःखातिरेकामुळे आत्महत्या , व्यसनाधिनता असले वाईट विचारही मनात येऊ शकतात.
पण ही सुद्धा एक परीक्षा व कसोटीच असते.
यावेळी मनाची खंबीरी व दृढ निश्चय खूप महत्वाचा ठरतो.

अशावेळी मनाचा असह्य कोंडमारा , व यातून मनाची भ्रामक स्थिती निर्माण झाल्यामुळे जग वेगळ्याच अर्थाने आपणाकडे पाहू लागते.

म्हणूनच तुकाराम महाराजांना त्यांची योग्यता न पारखताच ,
संपूर्ण समाजाने…
” *येडा तुक्या* …” अशी उपाधी लावली.
तरी सुद्धा तुकाराम महाराज आपल्या साधनेपासून व ईश्वर प्राप्तीच्या मूळ उद्देशापासून तसुभर देखील दूर झाले नाहीत.अथवा वैतागून त्यांनी चुकीचा रस्ता स्विकारला नाही.

महा सिध्दयोगी , शेगांव चे गजानन महाराज यांना तर दुष्ट लोकांनी उसाने देखील मारले.
म्हणून गजानन महाराज हताश उदास झाले नाहीत.

प्रत्येक महापुरूषांच्या , सत्याचरण करणा-या समाज सुधारकांच्या नशीबात हे लिहीलेलेच असते.आणी ते आनंदाने स्विकारून त्यावर मात देखील करायची असते.
तेंव्हाच दिव्यत्व व श्रेष्ठत्व ईश्वर बहाल करतो.

” *जावे ज्याच्या वंशा* *तेंव्हा कळे…”*
असो…

खूपच असह्य त्रास होत असेल तर गुरूमंत्राचा किंवा कुलदेवतेचा जप वाढवणे गरजेचे असते.
गुरूमंत्र घेतला नसेल अथवा कुलदेवता माहिती नसेल तर…?
” *रामकृष्णहरी…”*
या दिव्य व तारक मंत्राचा अखंड जप खूप उंचीवर घेऊन जातो.
कारण तो स्वयंसिध्द मंत्र आहे.त्याला वेगळा सिध्द करण्याची गरज नाही.

शत्रुपिडा , आर्थिक समस्या , कौटुंबिक विवाद व अनेक सिध्दी प्राप्ती साठी हा तारक मंत्र खूप महत्वाचा आहे.
म्हणूनच वारकरी संप्रदायात हा संजीवनी मंत्र अखंड पणे जपला जातो.
विशेष म्हणजे या मंत्राला कसलेही बंधन नाही.
खाता पिता उठता बसता चालता बोलता
हा मंत्र जप करता येतो…

” *रामकृष्णहरी*
*मंत्र हा अगाध*
*पळे भूत बाधा*
*भेणे तेथे…”*
हा माझा स्वानुभव आहे.

सगळे दोष , पीडा घालवून एक चैतन्य दाई , नवजीवन जगण्याची एक अफाट शक्ती या दिव्य मंत्रामध्ये नक्कीच आहे.

अनुभव घेऊन पहावा.
उतावळेपणा आणी शीघ्र फलप्राप्तीची आशा यासाठी अपेक्षित नाही.

” *जन्मोजन्मी आम्ही* *बहुपुण्य केले…* *तेंव्हा या विठ्ठले कृपा* *केली…”*
ही मनाची श्रेष्ठ व उच्चतम भावना दु:ख मुक्तीसाठी तारक ठरते.

कितीही भयंकर संकटे आली , कितीही मनाचा कोंडमारा झाला , कितीही अपमान पचवावे लागले , कितीही आत्मक्लेश भोगावे लागले , कितीही दुःख भोगावे लागले , स्वकिय व सामाजिक उद्रेक सहन करावा लागला…तरी सुद्धा सत्याचा , धर्माचा रस्ता कधिही सोडू नये.

सत्याचा विजय होवो अथवा न होवो, कितीही ठोकरा खाने पडो , पण ?
जीद्द , चिकाटी , प्रयत्नवादी , आत्मविश्वास कधिही सोडू नये.

भगवंताला सुद्धा दया येवो अथवा न येवो , त्याच्या वरची , त्याच्या दिव्य शक्ती वरची श्रध्दा कधिही ढळू देऊ नये.

दृढ श्रद्धा व आत्मविश्वास, चिकाटी , चिवटपणा नेहमी आत्मबळ तर वाढवतोच.पण त्यामुळे जीवन गतीशील राहते.

सोबत ईश्वरी चिंतन असेल तर ? आत्मबळ हजारो पटीने वाढते.
वय किती जरी वाढले तरी चेह-यावर सदैव नवचैतन्य जाणवते.

अनेक अशक्य गोष्टी शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्या आतमध्ये येते.

मनावर नेहमी एक फूंकर घालत जावी की…
” *अंतिम विजय हा* *शेवटी तुझाच आहे . “*

” *ये भी दिन जायेंगे…तेरे* *भी दिन* *आयेंगे…”*
हे माझ्या सद्गुरू आण्णांचे लाख मोलाचे वाक्य नेहमी माझ्या मनाला नवी उभारी देऊन जातात.

” *पंखो की शक्ती बढाता* *जा…मंजील* *तक* *बढता जा…दिनबदिन* *शक्तिमान बनता जा…”*
असले शब्द मनाला नेहमीच नवी उभारी व जीवनाला नवी उंची देऊन जातात.

*रामकृष्णहरी*
जय जय
*रामकृष्णहरी*
*जय हरी विठ्ठल*

🙏🚩🚩🚩

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!